सध्या राज्यात नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीची धामधूम सुरू असताना,(meeting) राजकीय वर्तुळात मोठी चर्चा घडवून आणणारी एक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची काल रात्री उशिरा मुंबईतील एका खासगी कार्यक्रमात सुमारे २० मिनिटांची भेट झाली आहे. या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.मंगळवारी रात्री उशिरा मुंबईत एका खासगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार संजय राऊत हे दोघेही उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही प्रमुख नेत्यांनी सुमारे २० मिनिटे एकमेकांशी संवाद साधला. या भेटीचा एक फोटोही समोर आला असून, यामध्ये संजय राऊत मास्क लावून बसलेले दिसत आहेत, तर देवेंद्र फडणवीस त्यांच्याशी चर्चा करताना दिसत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी (meeting)आपुलकीने संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. संजय राऊत अलीकडेच आजारपणातून बरे झाले आहेत. त्यामुळे ही भेट केवळ औपचारिक आणि प्रकृतीच्या चौकशीसाठी होती, असे बोलले जात आहे.मात्र, एकीकडे राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असताना, दोन प्रमुख विरोधी नेत्यांच्या या २० मिनिटांच्या खासगी भेटीमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत:काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी फडणवीस यांच्याबद्दल बोलताना म्हटले होते की, “देवेंद्र फडणवीस हे आमचे कधी काळी जवळचे मित्र होते आणि आम्ही नाती जपतो. राजकारण वेगळं आहे, व्यक्तिगत नाती वेगळी आहेत.

त्यांनी माझ्या आजारपणात फोन करून चौकशी केली, मदतही केली.(meeting)”तर दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनीही संजय राऊत यांच्या प्रकृती सुधारल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता. “ते बरे झाले याबद्दल मला अतिशय आनंद आहे. ते त्यांचं काम करतात. आम्ही आमचं काम करतो. पण कोणीही आमचा शत्रू नाही,” असे ते म्हणाले होते.दोन्ही नेत्यांनी व्यक्तिगत संबंधांना राजकारणापेक्षा वेगळे ठेवल्याचे या भेटीतून पुन्हा एकदा दिसून आले असले तरी, निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘नवे चित्र‘ काय असेल, याबद्दलची चर्चा सध्या शिगेला पोहोचली आहे.
हेही वाचा :
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्यात नवे धोरण लागू
केंद्र सरकारने 2026 मधील सुट्ट्यांची यादी केली जाहीर! जाणून घ्या कधी
हिवाळ्यात वाढतोय ब्रेन स्ट्रोकचा धोका; जाणून घ्या तज्ज्ञांचा खास