महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठा टप्पा साधला जात आहे. (elections)नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल 21 डिसेंबरला जाहीर होण्याच्या तयारीत असताना, राज्यातील महापालिका निवडणुकांची घोषणा लवकरच होण्याची शक्यता अधिक बळावली आहे. अधिकृत माहितीनुसार, 15 ते 17 डिसेंबर दरम्यान राज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते.

राज्यातील 32 पैकी 17 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्यास मनाई केली आहे. त्यामुळे आयोगाने जिल्हा परिषद व(elections) पंचायत समित्यांच्या निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महापालिका निवडणुकांना प्राधान्य देण्याचा मार्ग सुलभ झाला आहे.महापालिका निवडणुकांसाठी अंतिम मतदार यादी 10 डिसेंबरला प्रसिद्ध होईल. आयोग त्या यादीचा आढावा घेतल्यानंतर 3–4 दिवसांत निवडणुकीची अधिकृत घोषणा करेल, अशी माहिती मिळाली आहे.

संभाव्य वेळापत्रकानुसार, महापालिका निवडणुका (elections)15 डिसेंबर 2025 ते 10 जानेवारी 2026 दरम्यान पार पडतील, तर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 5 जानेवारी ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत मतदान होऊ शकते.राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांमुळे मोठी राजकीय हालचाल सुरू होणार असून, पक्षांनी आपल्या रणनीती अंतिम टप्प्यात नेली आहेत. विशेषतः मुंबईसह नागपूर, चंद्रपूरसारख्या महापालिकांमध्ये राजकीय स्पर्धा तीव्र होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्यात नवे धोरण लागू
केंद्र सरकारने 2026 मधील सुट्ट्यांची यादी केली जाहीर! जाणून घ्या कधी
हिवाळ्यात वाढतोय ब्रेन स्ट्रोकचा धोका; जाणून घ्या तज्ज्ञांचा खास