‘बिग बॉस १९’ अंतिम टप्प्यात आलं आहे. प्रणित मोरे, गौरव खन्ना, तान्या मित्तल, अमाल मलिक आणि फरहाना भट हे टॉप ५ फायनलिस्ट आहेत. नुकतीच मालती चहर घराबाहेर गेली. मालती आणि प्रणितची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडत होती. तसंच मालती, प्रणित आणि गौरव खन्ना यांची मैत्री गाजली. मात्र जातानाच मालती आणि प्रणितचं भांडण झालं. जाताना तिने प्रणितला माफही केलं नाही. त्यामुळे प्रणित अक्षरश: ओक्साबोक्शी रडत आहे.
जवळची मैत्रीण मालती चहर घराबाहेर पडल्यानंतर प्रणित मोरेचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. तो ओक्साबोक्शी रडत आहे. बाजूला उभा असलेला गौरव त्याला म्हणतो, ‘आता २-३ दिवसांचीच तर गोष्ट आहे मोरे’. यावर प्रणित रडत रडत म्हणतो, “पण असं संपायला नको होतं. एक तर माझ्याकडून भांडणंही झालं. तिच्याशी कोणी नीट बोलायचं नाही म्हणून मी तिच्यासोबत मजा मस्ती करायचो जेणेकरुन ती रिलॅक्स राहील. पण त्यातही गडबडच झाली.”
मालती चहर घराबाहेर पडताना प्रणितला हेच सांगून जाते की ‘सॉरी आपलं एका वाईट नोटवर सगळँ संपत आहे’. त्यावर प्रणित तिची माफीही मागतो. तेव्हा ती म्हणते,’मी आता माफ करणार नाही’.तो तिला ‘दार उघडतंय तोवर तरी बोल’. तसंच तान्या मालतीला ‘मिठी तर मार’ असं म्हणते. यावर मालती म्हणते,’आता कधीच नाही’. यानंतर प्रणितचा चेहरा पडतो.
७ डिसेंबर रोजी ‘बिग बॉस १९’चा फिनाले आहे. या सीझनचा विजेता कोण होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
