सध्या सगळ्यांकडे स्मार्ट फोन आहेत. या फोनमुळे आपली अनेक कामेही काही वेळात होतात. पण, याच फोनमुळे आपला वैयक्तिक डेटाही लीक होत असल्याचे समोर आले आहे. असेच एक प्रकरण समोर आले आहे. ‘ProxyEarth’ नावाची  एक वेबसाइट फक्त एका फोन नंबरचा वापर करून वापरकर्त्याचे ठिकाण आणि इतर वैयक्तिक माहिती उघड करू शकते. तुम्ही कदाचित या वेबसाइटबद्दल यापूर्वी ऐकले नसेल. पण ही वेबासाईट आपली हेरगिरी करत असल्याचा समोर आले आहे.

ही वेबसाइट फक्त फोन नंबर टाकून वापरकर्त्याचे नाव, ईमेल पत्ता आणि इतर वैयक्तिक माहिती उघड करते. ती वापरकर्त्याचे लाईव्ह लोकेशन देखील उघड करते. वेबसाइटने दिलेली माहिती जितकी अचूक आहे तितकीच ती भयानक आहे. 

या वेबसाइटबद्दलची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. ही वेबसाइट अजूनही लाईव्ह आहे. एकदा तुम्ही या वेबसाइटला भेट दिली की, तुम्ही फक्त तुमचा फोन नंबर एंटर करा, जो तुम्हाला त्याशी संबंधित सर्व माहिती देईल.

बऱ्याचदा, हा डेटा जुना असतो, परंतु आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ही वेबसाइट तुमचा आणि आमचा डेटा कुठून मिळवत आहे. याबाबतची माहिती समोर आलेली नाही. 

वेबसाइटवर हा डेटा कुठून येतो?

राकेश नावाचा व्यक्ती ही वेबसाईट चालवतो. अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याचे अकाउंट आहेत, तिथे त्याने विविध युक्त्या दाखवल्या आहेत. राकेशने आज तक या वृत्त वाहिनीला सांगितले की, त्याने काहीही चुकीचे केलेले नाही. त्याने कोणताही डेटा लीक केलेला नाही, तर वेगवेगळ्या वेळी लीक झालेला डेटा गोळा केला आहे. 

ही वेबसाइट सर्व नंबरची माहिती देत ​​नाही. काही नंबरमध्ये चुकीची माहिती देखील असू शकते, म्हणजेच वेबसाइट पूर्णपणे कार्य करत नाही. अशी आली माहिती वेबसाइटवर उघड झाला तर ती चिंतेची बाब आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *