इथियोपियातील हेयली गुबी ज्वालामुखीतून 12,000 वर्षांनंतर 23 नोव्हेंबर रोजी अचानक उद्रेक झाला,(prediction)ज्यामुळे जगभरात खळबळ उडाली. या घटनेचा परिणाम भारतापर्यंत जाणवला. या ज्वालामुखीच्या उद्रेकासंंबंधी बल्गेरियन महिला ‘ बाबा वेंगा ‘ यांनी खूप पूर्वीच भविष्यवाणी केली होती, असा अंदाज लावला जात आहे. बाबा वेंगा यांच्या अनेक भविष्यवाण्या यापूर्वीही खऱ्या ठरल्या आहेत, ज्यामुळे त्या जगभरात प्रसिद्ध आहेत.बाबा वेंगा यांनी 1986 च्या चेर्नोबिल अणुदुर्घटना, 9/11 चा दहशतवादी हल्ला आणि राजकुमारी डायनाची मृत्यू यांसारख्या घटनांचीही भविष्यवाणी केली होती, ज्या अत्यंत अचूक मानल्या जातात. त्यांनी 2025 सालासाठीही अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या, त्यापैकी एक या आठवड्यात खरी ठरली आहे.

रविवार, 23 नोव्हेंबर रोजी इथियोपियाच्या ईशान्येकडील हेयली गुबी ज्वालामुखी अचानक उद्रेक झाला. (prediction)सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या ज्वालामुखीच्या व्हिडिओमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले. व्हिडिओमध्ये धूर आणि राखेचा ढिग अवकाशात जाताना दिसत होता. शास्त्रज्ञांच्या मते, या उद्रेकाचा आसपासच्या गावातील शेतकऱ्यांवरही परिणाम झालाच. या ज्वालामुखीमुळे विमान वाहतूकही थांबवण्यात आली होती. सॅटेलाइटनुसार राख आणि सल्फर डायऑक्साइड असणारी दूषित हवा भारतापर्यंत पोहचली होती.

12,000 वर्षांनंतर अचानक ज्वालामुखी फुटल्याची बातमी येताच इंटरनेटवर अनेक नवीन सिद्धांत समोर आले. शास्त्रज्ञांच्या मते, या ज्वालामुखीचा शेवटचा उद्रेक हिमयुगाच्या शेवटी झाला होता. (prediction)त्यामुळे लोक याबद्दल विविध प्रश्न विचारत आहेत आणि ही गोष्ट इंटरनेटवर वेगाने पसरत आहे. दरम्यान, ज्वालामुखी फुटल्यानंतर लगेचच लोकांनी बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्यांबद्दल माहिती घेण्यास सुरुवात केली. अनेक जण असा अंदाज लावत आहेत की 2025 सालासाठीची एक भविष्यवाणी खरी ठरली आहे.

EuroNews ने बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्यांबद्दल दावा केला आहे की 2025 मध्ये अनेक ज्वालामुखी उद्रेक होऊ शकतात. तथापि, प्रत्येकजण या मताशी सहमत नाही. (prediction)बरेच लोक मानतात की सुमारे 30 वर्षांपूर्वी मरण पावलेली महिला भविष्यातील घटना इतक्या अचूकपणे कशा सांगू शकते, त्यामुळे या भविष्यवाण्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवणे योग्य नाही. ज्वालामुखीचा उद्रेक ही काही खूप अनोखी घटना नाही. ब्रिटिश जिओलॉजिकल सर्वेनुसार, दरवर्षी सुमारे 50 ते 70 ज्वालामुखींचा उद्रेक होतो. त्यामुळे, अशा परिस्थितीत जर एखाद्याने भविष्यवाणी म्हणून ज्वालामुखीच्या उद्रेकाविषयी सांगितले, तर ते खरे होण्याची शक्यता आधीच खूप जास्त असते.

हेही वाचा :

पलाश मुच्छलचं आणखी एक कांड आलं समोर! आता ‘या’ महिलेसोबत

भाऊ मानल्याचं नाटक, पुणेकर महिलेचे कोल्हापूरच्या 47 वर्षीय

राज्यात पुढील २ दिवस कसं असणार हवामान? जाणून घ्या हवामान

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *