कार्तिकची बहिण कृतिका तिवारीचा हळदी समारंभ थाटामाटत पार पडला. त्याचे अनेक फोट कार्तिक आर्यनने शेअर केले. तो त्याच्या बहिणीसोबत या सुंदर क्षणाचा आनंद घेताना दिसला. आता, कृतिकाच्या लग्नापूर्वीच्या संगीत समारंभातील कार्तिकचा एक व्हिडिओ समोर आला आहे आणि तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या व्हायरल होण्यामगंच कारण म्हणजे त्याचा भोजपूर गाण्यावर जोरदार डान्स परर्फोमन्स. 

कार्तिक आर्यनने त्याच्या बहिणीच्या संगीत पार्टीत धमाल केली. त्याने भोजपुरी गाण्यांवर डान्सही केला. सोशल मीडियावर अभिनेता पवन सिंगच्या “तू लागेवेलु जब लिपस्टिक लॉलीपॉप लागेलु” या प्रसिद्ध भोजपुरी गाण्यावर नाचतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. अभिनेत्याच्या या व्हायरल व्हिडीओवर लाईक आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला आहे. 

कार्तिक आर्यनने त्याच्या मजेदार चालींनी आणि स्टेप्सनी समारंभ गाजवला. या समारंभातील फोटमध्ये त्याचे नातेवाईकसुद्धा त्याच्यासोबत नाचनाता आणि मजा करताना दिसत आहेत. त्याच्या बहिणीच्या संगीत पार्टीत, त्याने पीच रंगाच्या फुलांची डिझाइन असलेला कुर्ता आणि पांढऱ्या पायजम्यात खूपच डेशिंग दिसत होता. कार्तिकचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

कार्तिकने त्याच्या बहिणीच्या लग्नात त्याचे कर्तव्य बजावले
कार्तिक आर्यनची बहीण कृतिका तिवारी हिचे लग्न झाले आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत, ज्यामध्ये कार्तिक आर्यन तिच्या बहिणीच्या लग्नाच्या सर्व विधी पूर्ण करत असताना त्यांच्यासोबत दिसत आहे. त्याच्या परंपरेनूसार बहिणीच्या डोक्यावर तो फुलांची चादर घेऊन भावाचं कर्तव्य पार पाडताना दिसला. तो यावेळी थोडा भावूकही झाला. 

संगीत पार्टीनंतर अभिनेता ऑफ-व्हाइट कुर्ता-पायजमामध्ये खूपच सुंदर दिसत होता, तर त्याची बहीण गुलाबी फुलांच्या जरीदार लेहेंग्यात खूपच आकर्षक दिसत होती.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *