विधानसभेत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला होता,(EVMs) तर राज्यात लोकसभा निवडणुकीत बसलेल्या धक्क्यानंतर महायुतीनं जोरदार पुनरागमन केल्याचं पाहायला मिळालं. महायुतीला महाराष्ट्रात मोठं यश मिळालं, तब्बल 232 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर सातत्यानं महाविकास आघाडीकडून ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला जात आहे, ईव्हीएमद्वारे होणाऱ्या मतदानावर शंका घेतली जात आहे. आगामी काळात मतदान बॅलेट पेपरवर घ्या अशी मागणी विरोधक करत आहे.

एकीकडे विरोधकांकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जात असतानाच दुसरीकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकी संदर्भात बोलताना मोठा गौप्यस्फोट केला होता. (EVMs)‘महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी 2 माणसं मला भेटायला आली होती. ही 2 माणसं मला विधानसभेच्या 288 जागांपैकी 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते. 160 जागांवर ते मतांची फेरफार करण्याबाबत मला सांगत होते’, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं, शरद पवार यांच्या या दाव्यामुळे राज्यात वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान त्यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्याकडून ईव्हीएम संदर्भात मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीन मॅनेज करून देण्याची ऑफर देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट सटाण्याचे माजी आ.संजय चव्हाण यांनी केला आहे. संजय चव्हाण हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार आहेत.

त्यांनी पुढे बोलताना असं देखील म्हटलं आहे, की ही ऑफर गुजरातच्या नारायणदास पटेल या व्यक्तीने दिली होती. पटेल हे गुजरातच्या भूज येथे आयटी तज्ज्ञ आहेत. 50 हजार ते दीड लाखापर्यंत मताधिक्य वाढवून देण्याचा दावा पटेल यांनी केला होता. त्यासाठी त्यांनी 5 ते 8 कोटी रुपयांची मागणी केली होती. (EVMs)ईव्हीएम आणि पोलीसही गुजरातचे असल्यामुळे मशीन मॅनेज करणं शक्य असल्याचा दावा करण्यात आला होता, ही बाब तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही कळवली होती, मात्र महाविकास आघाडीला चांगला जनाधार असल्याचं त्यांनी मला सांगितलं होतं, असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.दरम्यान पटेल सटाण्यात देखील येऊन गेला होता, तुम्ही नाही केले तर विरोधी उमेदवारांची भेट घेणार असल्याचंही त्याने सांगितलं होतं. त्याची तक्रारही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे करण्यात आली होती, असा खळबळजनक दावा चव्हाण यांनी केला आहे.
हेही वाचा :
देवेंद्र फडणवीसांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा
दिवाळीनंतर दैनंदिन वापरातील ‘या’ वस्तू स्वस्त होणार? मोदींनी दिले संकेत
माउंटबॅटन यांना भारतातील कोणत्या शहरात प्रेम झाले? त्यांची लव्हस्टोरी तुम्हाला नक्कीच माहीत नसेल