केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येत्या वर्षात (important)महाराष्ट्रातील रस्ते, पूल, एक्सप्रेसवे आणि इतर महत्त्वाच्या विकासकामांसाठी १.५ लाख कोटी रुपयांची कामे मंजूर केल्याची मोठी माहिती दिली आहे. या प्रकल्पांमध्ये ५० हजार कोटींची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात येणार आहेत.पुणे-संभाजीनगर सुपर एक्सप्रेसवे १६,३१८ कोटी गडकरी यांनी पुणे-छत्रपती संभाजीनगर मार्गावर १६,३१८ कोटींचा नवीन एक्सप्रेसवे बांधला जाईल अशी घोषणा केली. या मार्गाचा पहिला टप्पा पुणे-अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर असा असेल. या सुपर कनेक्टिव्हिटीमुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर हे अंतर केवळ दोन तासांत आणि छत्रपती संभाजीनगर ते नागपूर हे अंतर अडीच ते पावणे तीन तासांत पार करणे शक्य होईल. दुसरा मार्ग शिक्रापूर ते अहिल्यानगर बाहेरून बीड जिल्ह्यातून काढण्यात येणार आहे.

तळेगाव-चाकण-शिक्रापूर एलिव्हेटेड प्रकल्प ४,२०७ कोटी या प्रकल्पात खाली रस्ता, (important)त्यावर दोन उड्डाणपूल आणि सर्वात वर मेट्रो मार्गिका असलेले चार स्तरांचे बांधकाम केले जाईल. याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच भूमिपूजन होणार आहे. हडपसर ते यवत एलिव्हेटेड प्रकल्प ५,२६२ कोटी याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाला आहे.पुणे-मुंबई-बेंगळुरू कनेक्टिव्हिटी पुणे-मुंबई एक्सप्रेसवे तसेच पुणे-बेंगळुरू एक्सप्रेसवेच्या १३० किलोमीटर भागासाठी अटल ब्रीज ते पुणे-शिवार जंक्शनपर्यंत १५ हजार कोटींचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. यामुळे पुणे-मुंबई अंतर सुमारे दीड तासांत आणि पुणे-मुंबई-बेंगळुरू अंतर साडे पाच तासांत पूर्ण करता येईल.

नाशिक फाटा ते खेड महामार्ग एनएचएआय अंतर्गत येणाऱ्या या मार्गाचे (important)भूसंपादन ९३ टक्के पूर्ण झाले आहे. नाशिक फाटा ते आळंदी फाटा ४,४०३ कोटी आणि आळंदी फाटा ते खेड ३,३९८ कोटी असे दोन टप्पे यात समाविष्ट आहेत. कळंबोळी विकास प्रकल्पासाठी ७७० कोटींची मंजुरी देण्यात आली आहे. या सर्व कामांमुळे राज्यातील वाहतूक सुविधा सुधारतील आणि व्यापारी वाहतूकीला गती मिळेल, असे गडकरी म्हणाले.

हेही वाचा :

दोन दिवस फोनपे-गुगलपे बंद राहणार, या बँकेच्या ग्राहकांना फटका

पोलिसांसाठी सुखद वार्ता! ५३८ चौरस फूट सरकारी घरे मंजूर; महाराष्ट्र

अजितदादांना अडचणीत आणण्यासाठीच भाजपने ..करुणा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *