राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडवणारे गंभीर आरोप स्वराज्य (revelation) शक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा मुंडे यांनी जळगाव येथील पत्रकार परिषदेत केले. भाजपने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खच्चीकरण करण्यासाठीच पार्थ पवार यांच्या कथित घोटाळ्याचा मुद्दा पुढे आणला, असा थेट आरोप त्यांनी केला. अनेक वर्षे हा विषय कधीही पुढे आला नाही, पण निवडणुकीच्या तोंडावरच तो चर्चेत येण्यामागे राजकीय हेतू असल्याचा संकेत त्यांनी दिला.

करुणा मुंडे म्हणाल्या की, एवढा मोठा घोटाळा असल्याचा दावा केला जातो,(revelation) पण पार्थ पवार कुठे आहेत? ते जेलमध्ये का नाहीत? त्यांना कोण वाचवत आहे? उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा असल्यामुळे त्यांना संरक्षण मिळत आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राजकारणातील दीर्घ अनुभवाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, गेल्या २७ वर्षांपासून धनंजय मुंडे यांच्यासोबत राहून त्यांनी राजकीय घडामोडी जवळून पाहिल्या आहेत आणि त्यामुळेच सत्य समोर आणत असल्याचा दावा त्यांनी केला.

याचबरोबर, भाजप उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही(revelation) गटांच्या शिवसेनेला कमजोर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजपचा हेतू हुकूमशाही पद्धतीने सत्ता चालवण्याचा असून, हेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना अभिप्रेत असल्याचा दावा करुणा मुंडे यांनी पुढे केला. सत्तेचा गैरवापर करू नका, सत्ता चिरस्थायी नसते, उद्या कुणीही सत्तेत येऊ शकते, त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी सावध राहावे, असा सल्लाही त्यांनी दिला.त्यांच्या या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

हेही वाचा :

विधानभवनात गदारोळ! आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज! DA ‘इतक्या’ टक्क्यांनी

३१ डिसेंबरपर्यंत ‘ही’ ५ कामं न केल्यास भरावा लागेल मोठा दंड!Edit

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *