देशातील वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेत यंदा मोठा बदल घडत (postgraduate)असून, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून तब्बल चार हजार १४० नव्या जागांना मान्यता देण्यात आली आहे. या जागांचा प्रवेशप्रक्रियेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या फेरीत समावेश होण्याची शक्यता असल्याने, पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांची पहिली फेरी नुकतीच पार पडली असून, (postgraduate)येत्या काही दिवसांत दुसरी फेरी सुरू होणार आहे. सध्या प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या जागा अत्यल्प असल्याने प्रवेशासाठी तीव्र स्पर्धा निर्माण होते. अनेक गुणवत्ताधारक विद्याथ्यांनाही जागा कमी असल्यामुळे प्रवेशापासून वंचित राहावे लागते. या पार्श्वभूमीवर, देशभरात झालेली ही ५५ टक्क्यांची वाढ महत्त्वाची मानली जात आहे.

महाराष्ट्रात १८१ नव्या जागा महाराष्ट्रातही या निर्णयाचा लाभ होणार असून,(postgraduate) राज्यात एकूण १८१ नव्या पदव्युत्तर जागांची भर पडली आहे. विशेषतः त्वचाविज्ञान व कुष्ठरोग, रेडिओ निदान, शस्त्रक्रिया, श्वसन वैद्यक, रेडिएशन ऑन्कोलॉजी, कान-नाक-घसा विकार, नेत्ररोग, मानसोपचार, बालरोग, अस्थिव्यंगशास्त्र, भूलतज्ज्ञ, प्रसूतिशास्त्र व स्त्रीरोगशास्त्र या अभ्यासक्रमांमध्ये जागा वाढल्या आहेत.

देशातील वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी तब्बल ४,१४० नव्या जागांना राष्ट्रीय (postgraduate)आयुर्विज्ञान आयोगाने मान्यता दिली आहे. यामुळे पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असून, प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या फेरीत या जागांचा समावेश होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात १८१ नव्या जागांची भर पडली आहे.

हेही वाचा :

जबरदस्त योजना! फक्त व्याजातून मिळणार २.५० लाख रुपये; गुंतवणुकीचं कॅल्क्युलेशन वाचा

‘महानगरपालिका जानेवारी महिन्यात तर जिल्हा परिषद निवडणुका…’; भाजपच्या बड्या नेत्याचे

बाप की हैवान! सावत्र बाप लेकीच्या छातीला स्पर्श करायचा, मिठ्या मारायचा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *