प्रत्येकाने आपल्या भविष्याच्या दृष्टीने आतापासूनच बचत करायला हवी.(interest)दर महिन्याला पगारातील एक ठरावीक रक्कम बाजूला काढून ठेवा. दरम्यान, तुम्ही ही रक्कम एखाद्या योजनेत गुंतवली तर तुम्हाला चांगले व्याजदर मिळणार आहे. तुम्ही पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करु शकतात. यामध्ये तुम्हाला व्याजावरदेखील व्याज मिळणार आहे.

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योना सरकारद्वारे चालवली जाते.(interest) त्यामुळे या योजनेत सुरक्षेची हमी असते. तुम्हाला या योजनेत महिन्याला फक्त ५००० रुपये गुंतवायचे आहे. फक्त ५ हजार रुपये गुंतवून तुम्ही ८ लाख रुपये मिळवू शकतात. या योजनेत फक्त व्याजातून तुम्हाला २.५४ लाख रुपये मिळणार आहेत.

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजनेत तुम्हाला ६.७ टक्के व्याजदर मिळते.(interest) हे व्याजदर तिमाही आधारावर असते. त्यामुळे तीन महिन्यांनी ही व्याजदर बदलू शकते.पोस्ट ऑफिसर आरडी योजनेत तुम्हाला दर महिन्याला फक्त ५००० रुपये गुंतवायचे आहे. ५ वर्षासाठी तुम्ही हे पैसे गुंतवायचे आहे. या योजनेत ५ वर्षांसाठी तुम्ही ३ लाख रुपये गुंतवणार आहेत. यावर ६.७ टक्के व्याजदरानुसार ५६,८३० रुपये व्याज मिळणार आहे.पोस्टाच्या आरडी योजनेत जर तुम्ही अजून ५ वर्षांसाठी गुंतवणूक केली तर एकूण ६ लाख रुपये गुंतवणार आहात. त्यावर तुम्हाला २,५४,२७२ रुपये व्याज मिळेल. म्हणजे तुम्हाला १०वर्षात एकूण ८,५४,२७२ रुपये मिळणार आहेत.
हेही वाचा :
दोन दिवस फोनपे-गुगलपे बंद राहणार, या बँकेच्या ग्राहकांना फटका
पोलिसांसाठी सुखद वार्ता! ५३८ चौरस फूट सरकारी घरे मंजूर; महाराष्ट्र
अजितदादांना अडचणीत आणण्यासाठीच भाजपने ..करुणा