सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.(government) मल्टी टेक्नोलॉजी कंपनी BEML मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बीईएमएल ही कंपनी सुरक्षा मंत्रालयाअंतर्गत येते. या सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.बीईएमएल कंपनीत एचआर प्रोफेशनल पदासाठी भरती निघाली आहे. त्यामुळे एचआरमध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. तुम्ही सरकारी कंपनीत एचआर असिस्टंट मॅनेजर बनू शकतात. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचे आहेत. या नोकरीसाठी तुम्ही bemlindia.in वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.

BEML कंपनीत एकूण २२ पदांसाठी भरती केली जाणार आहे.(government) ऑफिसर असिस्टंट एचआर ग्रेड II, असिस्टंट मॅनेजर ग्रेज III पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जानेवारी २०२६ आहे. त्यामुळे इच्छुकांनी त्याआधी अर्ज करावेत.बीईएमएल कंपनीत ऑफिसर एचआर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २९ वर्षे असावी तर असिस्टंट मॅनेजर एचआर पदासाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा ३० वर्षे असावी. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ४०,००० ते १,६०,००० रुपये पगार मिळणार आहे.

ऑफिसर एचआर पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. (government) याचसोबत फुल टाइम एमबीए एचआर/आयआर केलेले असावे. याचसोबत पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री, पर्सनल मॅनेजमेंट अँड इंडस्ट्रीयल रिलेशनमध्ये डिप्लोमा प्राप्त केलेला असावा. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोर्स केलेला असावा.याचसोबत ऑफिसर पदासाठी २ वर्षांचा अनुभव असावा तर असिस्टंट मॅनेजर पदासाठी ४ वर्षांचा अनुभव असावा. या नोकरीसाठी इच्छुकांनी अधिकृत वेबसाइटवर अर्ज करावेत.
हेही वाचा :
पार्टी ऑल नाईट! 31st रात्रभर गाजणार; पब, रेस्टॉरंट पहाटेपर्यंत
१ जानेवारी २०२६ पासून ६ नियम बदलणार, कर्मचाऱ्यांपासून ते
घराच्या बाल्कनी आणि गॅलरीत कबुतरं येऊ नयेत यासाठी सोपे, मुघल