मुंबईतील दहिसर परिसरात वडिलांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे!(touches)१४ वर्षीय मुलीचा तिच्याच सावत्र बापाने विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शिवाय त्याच्यावर पोक्सो कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही चौदा वर्षांची असून ती दहिसर येथे राहते.(touches) गेल्या एक काही दिवसांपासून तो तिच्याशी जवळीक साधून अश्लील चाळे करायचा. तिला मिठी मारून, तिच्या छातीला अश्लील स्पर्श करत तिचा विनयभंग करायचा. हा प्रकार गेले कित्येक दिवस सुरु होता. या घटनेने ती प्रचंड घाबरली होती. बदनामीमुळे तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही.
दोन दिवसांपूर्वी नराधमाने पुन्हा तिच्याशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिने दहिसर पोलिसांत धाव घेत घडलेला प्रकार सांगितला आणि सावत्र बापाविरुद्ध तक्रार केली. या घटनेची पोलिसांनी तातडीने गंभीर दखल घेत तिच्या सावत्र बापाविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.

यानंतर पोलिसांनी काही तासांतच आरोपीला अटक केली. (touches)अटकेनंतर त्याला दिंडोशीतील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान या घटनेनंतर मुली स्वतःच्या घरात देखील सुरक्षित नाहीत का असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा :
दोन दिवस फोनपे-गुगलपे बंद राहणार, या बँकेच्या ग्राहकांना फटका
पोलिसांसाठी सुखद वार्ता! ५३८ चौरस फूट सरकारी घरे मंजूर; महाराष्ट्र
अजितदादांना अडचणीत आणण्यासाठीच भाजपने ..करुणा