कोल्हापुरातील रंकाळा तलावाचा सुंदर दृश्य पाहण्यासाठी बरेचसे पर्यटक (Lake)वीकेंडसाठी येत असतात. शनिवारी देखील रंकाळ्यावर पर्यटकांची गर्दी होती. त्यातच सकाळी एका गर्भवती महिलेने रंकाळा तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.बेळगाव जिल्ह्यातील चिखली कणकुंबी ता. खानापूर येथील नेहा ज्ञानेश्वर पवार वय 27 असे या महिलेचे नाव आहे. शनिवारी 14 डिसेंबर सकाळी राजघाटाजवळ तिचा मृतदेह तलावात तरंगताना आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे यांच्या पथकाने अग्निशमन दलाच्या मदतीने हा मृतदेह बाहेर काढला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला. या महिलेने मानसिक नैराश्यातून रंकाळा तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

नेहा या म्हापसा गोवा येथे राहात होत्या. त्यांचे पती ज्ञानेश्वर पवार हे (Lake)बांधकाम साईटवर काम करतात. शुक्रवारी 12 डिसेंबर सकाळी नेहा न सांगता घरातून बाहेर पडल्या. एक दिवस उलटूनही त्या परतल्या नाहीत, म्हणून पतीने म्हापसा पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद केली होती. दरम्यान, शनिवारी सकाळी रंकाळा तलावात महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर ओळख पटविण्याचे काम सुरू झाले. मृतदेहाजवळ सापडलेला मोबाईल तपासला असता त्यातील क्रमांकावरून पती आणि वडिलांशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर मृतदेह नेहा पवार यांचा असल्याचे स्पष्ट झाले. नातेवाईक रात्रीच कोल्हापुरात दाखल झाले.

उत्तरीय तपासणीत नेहा या साडेपाच महिन्यांच्या गर्भवती असल्याचे समोर आले. (Lake)पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही आठवड्यांपासून त्या मानसिक तणावात होत्या. त्यांच्या वडिलांनी सांगितले की, “नेहा एका महिन्यापासून नैराश्येत होती. आम्ही तिला समजावले, आधार दिला; पण तिची मनःस्थिती स्थिर होत नव्हती. शेवटी ती काहीही न सांगता घरातून निघून गेली आणि हे टोकाचे पाऊल उचलले.” पोलिसांच्या प्राथमिक तपासातही आत्महत्येच्या मागे मानसिक नैराश्यच कारणीभूत असल्याचे सूचित झाले आहे.
हेही वाचा :
जबरदस्त योजना! फक्त व्याजातून मिळणार २.५० लाख रुपये; गुंतवणुकीचं कॅल्क्युलेशन वाचा
‘महानगरपालिका जानेवारी महिन्यात तर जिल्हा परिषद निवडणुका…’; भाजपच्या बड्या नेत्याचे
बाप की हैवान! सावत्र बाप लेकीच्या छातीला स्पर्श करायचा, मिठ्या मारायचा