महाराष्टातील नगरपरिषद निवडणूका पार पडून निकालही लागला आणि (campaign)आता मुंबई महानगरपालिका निवडणूकीला अगदी काही दिवसच बाकी आहेत. तरी सर्व राजकीय पक्षांनी त्यांच्या त्यांच्या पक्षाचा प्रचार करण्यास सुरूवात केली आह. दरम्यान ‘कोल्हापूर कस्सं तुमी म्हनशीला तस्सं’ या टॅगलाईननं कोल्हापूर महापालिकेच्या प्रचाराला काँग्रेसनं सुरुवात केली आहे. कोल्हापूरकरांना कोल्हापुरात कसा विकास हवा आहे हे त्यांनी ठरवावं असं सांगून ही निवडणूक जनतेच्या हातात देण्याचा प्रयत्न काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केला आहे.

कोल्हापूरच्या निवडणुकीत आतापर्यंत वेगवेगेळे कॅम्पेन सुपरहिट ठरले होते. (campaign) यापूर्वी ‘आमचं ठरलंय’ ही टॅगलाईन घेऊन निवडणूक लढवली गेली होती. ही टॅगलाईनही हिट झाली आणि निवडणूकही सतेज पाटील जिंकले होते. पण मागच्यावेळी ‘कंडका पाडायचा’ ही टॅगलाईन हिट तर झाली होती पण निवडणूक मात्र फेल झाली. “यंदा कोल्हापूर कस्सं? तुमी म्हनशीला तस्सं” ही नवी टॅगलाईन घेऊन काँग्रेस मैदानात उतरलीय. ही टॅगलाईन म्हणजे कोल्हापूरकरांचा जाहिरनामा असल्याचं सतेज पाटल यांनी म्हटले आहे.

कोल्हापूर महापालिकेसाठी महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवणार (campaign) असल्याचं काँग्रेसनं जाहीर केलंय. पण काँग्रेसनं वेळ आली तर प्लॅन बी पण तयार केल्याचं सांगून स्वबळासाठीही तयार असल्याचे संकेत दिले आहेत.उमेदवारांवर अधिकाऱ्यांच्या मार्फत दबाव आणला जात असल्याचा आरोप दरम्यान सतेज पाटील यांनी काँग्रेसच्या काही उमेदवारांवर अधिकाऱ्यांच्या मार्फत दबाव आणला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्या अधिकाऱ्यांना 16 जानेवारीनंतर पाहून घेऊ असा गर्भीत इशाराही त्यांनी दिला आहे. काँग्रेसच्या या टॅगलाईनची भाजप आणि आपनं खिल्ली उडवली आहे. दहा वर्ष महापालिकेत सतेज पाटीलच सत्तेत होते. त्यामुळं कोल्हापूरकर आता काँग्रेसलाच सवाल विचारतील असा टोला भाजप आणि आपनं लगावला आहे.महाराष्ट्रातील नगरपरिषद निवडणूका झाल्यानं कोल्हापूर कस्सं ते कोल्हापूरकर मतपेटीतून सांगतीलच पण यावेळीही कोल्हापूर कस्सं हे सांगताना काँग्रेसमुक्त हवं असं मतपेटीतून सांगितलं नाही म्हणजे मिळवली त्यामुळं फक्त टॅगलाईन नाही तर कोल्हापूरकरांनी मनं जिंकण्यासाठी काहीतरी ठोस करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे काँग्रेस नेते संदिप पाटील यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :
वारंवार पायात गोळे येत असतील तर व्हा सावध, या आजाराचे असू शकतील संकेत
‘धुरंधर’ने विदेशातील बॉक्स ऑफिस गाजवलं, ‘या’ देशात करतोय विक्रमी कमाई
चहा-बिस्किटचं कॉम्बिनेशन शरीरारासाठी घातक