महाराष्ट्रातील महापालिकांच्या तारखा आज जाहीर करण्यात आल्या.(corporations) राज्य निवडणूक आयोगाकडून आज सोमवारी संध्याकाळी ४ वाजता पत्रकार परिषद घेण्यात आली. यात सर्व महापालिका निवडणूक प्रक्रिया कधी पार पडेल याची माहिती देण्यात आली. राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी २०२६ ला मतदान होणार आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या निकालानंतर राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील. त्या तारखांकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागलंय.

सर्वाच्च न्यायालयाने ३१ जानेवारी आधी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका (corporations)घेण्याचे आदेश दिलेत. पण आरक्षणामुळे २० जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पेच निर्माण झाला. त्यामुळे या निवडणुका जानेवारीत ढकलल्या गेल्या. २१ जानेवारी रोजी आरक्षणावर कोर्टात सुनावणी होणार आहे, त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुका मार्ग मोकळा होईल. त्यामुळे जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात झेडपीसाठी मतदान होईल, असा अंदाज वर्तवला जातोय. तर डिसेंबरच्या अखेरीस निवडणुकीची घोषणा होऊ शकते.
पत्रकार परिषदेत महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या(corporations) निवडणुकीच्या तारखा आणि संपूर्ण कार्यक्रम जाहीर करण्यात आला. या निवडणुकांमुळे राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांमधील कारभाराची दिशा ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत घ्या, असे निर्देश सरकारला दिले होते.त्यानुसार निवडणूक आयोगाने तीन टप्प्यांत या निवडणुका घेण्याचे नियोजन केले होते. आधी नगर परिषदा आणि नगर पंचायत निवडणुका पार पडल्या आहेत. त्यानंतर महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. २९ महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर राज्यातील ३४ जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडतील.

दरम्यान महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या (corporations)सार्वत्रिक निवडणुका ४ वर्षांपासून रखडल्या होत्या. निवडणुका रखडल्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाकामांवर परिणाम झालाय. विकासाच्या अनेक योजना ठप्प झाल्या असून नागरिकांचे प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. तर गेल्या २-३ वर्षापासून या महापालिकांच्या निवडणुका रखडल्या होत्या. मात्र अखेर आज निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला. राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यात होणार, अशी माहिची सूत्रांकडून आधीच मिळाली होती. ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही असेही सांगण्यात आले होते.
हेही वाचा :
जबरदस्त योजना! फक्त व्याजातून मिळणार २.५० लाख रुपये; गुंतवणुकीचं कॅल्क्युलेशन वाचा
‘महानगरपालिका जानेवारी महिन्यात तर जिल्हा परिषद निवडणुका…’; भाजपच्या बड्या नेत्याचे
बाप की हैवान! सावत्र बाप लेकीच्या छातीला स्पर्श करायचा, मिठ्या मारायचाEdit