गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावात आहेत.(lower)त्यामध्येच अमेरिकेने भारतावर गंभीर आरोप करत भारताने अमेरिकेत तांदळाची डंपिंग केल्याचे म्हटले. मात्र, आता हे आरोप भारताकडून फेटाळून लावण्यात आली. सरकारने स्पष्टपणे म्हटले की, भारतातून अमेरिकेत निर्यात केला जाणारा तांदूळ हा बहुतेक प्रीमियम दर्जाचा बासमती तांदूळ आहे. सामान्य बासमती तांदळापेक्षा हा तांदूळ महाग आहे. त्यामुळे भारताने डंपिंग केल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. भारताने म्हटले की, अमेरिकेने या प्रकरणी अद्याप कोणतीही औपचारिक चौकशी सुरू केलेली नाही. मात्र, त्यापूर्वीच अमेरिकेने आपले म्हणणे स्पष्ट केले. भारताला डंपिंगची कोणतीही प्रथमदर्शनी शक्यता दिसत नाही, असे भारताने स्पष्ट केले.

भारतीय व्यापार सचिव राजेश अग्रवाल यांनी म्हटले की, (lower)भारताच्या तांदळाच्या निर्यातीचे स्वरूप वेगळे आहे. त्याचे वर्गीकरण बाजारभावापेक्षा कमी किंमतीत विक्री म्हणून केले जाऊ शकत नाही. डंपिंग म्हणजे एखादे उत्पादन त्याच्या सामान्य किंमतीपेक्षा कमी किंमतीत निर्यात करणे होते. बासमती तांदूळ त्याच्या सुगंध आणि गुणवत्तेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंंमत नक्कीच जास्त आहे. विशेष म्हणजे बासमती तांदळाला तेवढी मागणी देखील आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी शेतकऱ्यांसोबतच्या बैठकीदरम्यान भारतातून निर्यात होणाऱ्या तांदळावर (lower)अधिकचे शुल्क लादण्याचे संकेत दिले आहेत. यादरम्यान त्यांनी भारतावर तांदळाची डंपिंग केल्याचा आरोप केला. भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यात देश आहे. भारतातून दरवर्षी अमेरिकेसह अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात तांदूळ निर्यात केला जातो. भारताने अमेरिकेच्या भाष्यावर स्पष्ट भूमिका घेतली आहे.

आमच्या तांदळाचा बाजार भावच जास्त आहे तर (lower)आम्ही तो स्वस्ता का विकावा असे भारताने म्हटले. मात्र, अजून तरी अमेरिकेने या डंपिंगच्या आरोपावर कोणतीही चाैकशी समिती नेमली नाहीये. 2024-25 मध्ये भारताने एकून 20.2 दहलक्ष मेट्रिक टन तांदळाची निर्यात केली. यापैकी, सुमारे 3.35.000 टन तांदूळ अमेरिकेत निर्यात करण्यात आला. ज्यात सुमारे 2,74,000 टन बासमती तांदळाचा समावेश होता

हेही वाचा :

जबरदस्त योजना! फक्त व्याजातून मिळणार २.५० लाख रुपये; गुंतवणुकीचं कॅल्क्युलेशन वाचा

‘महानगरपालिका जानेवारी महिन्यात तर जिल्हा परिषद निवडणुका…’; भाजपच्या बड्या नेत्याचे

बाप की हैवान! सावत्र बाप लेकीच्या छातीला स्पर्श करायचा, मिठ्या मारायचाEdit

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *