डिसेंबर महिन्याच्या कडाक्याच्या थंडीतही मध्यरात्री हजारो फुटबॉल (fans)चाहत्यांनी महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचे जोरदार स्वागत केले. मेस्सी सध्या तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आला असून, या भेटीदरम्यान तो देशातील चार शहरांना भेट देणार आहे. जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू मानल्या जाणाऱ्या मेस्सीचे जगभरात लाखो चाहते आहेत आणि त्याच्या प्रत्येक खासगी गोष्टीबद्दल त्यांना उत्सुकता असते. याच दौऱ्यात मेस्सीची पत्नी ॲन्टोनोला रोक्कुझोचीही चर्चा फॅन्समध्ये होत आहे. मेस्सीने २०१७ मध्ये त्याची प्रेयसी ॲन्टोनोला रोक्कुझोशी लग्न केले आणि त्यांना तीन मुले आहेत.

लिओनेल मेस्सीची पत्नी ही ॲन्टोनोलाची सर्वात मोठी ओळख असली तरी, (fans)ती एक लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लूएंसर देखील आहे. इन्स्टाग्रामवर तिचे मोठे फॉलोअर्स असून, ती फिटनेस ब्रँड्ससाठी मॉडेलिंग करते, जी तिच्या उत्पन्नाची मोठी स्रोत आहे.ॲन्टोनोला मेस्सीच्या आयुष्यात एक भक्कम आधारस्तंभ म्हणून उभी आहे. एकदा मेस्सीने एफसी बार्सिलोना संघाकडे तिचे कौतुक करताना सांगितले होते की, ॲन्टोनोलामधे अनेक उत्तम गुण आहेत. ती दैनंदिन जीवनातील गोष्टी उत्तम प्रकारे हाताळते, तिचा मूड नेहमी चांगला असतो आणि ती कोणत्याही समस्या अतिशय चांगल्या पद्धतीने सोडवते. तो तिला खूप हुशार मानतो.
लिओनेल मेस्सी आणि ॲन्टोनोला रोक्कुझो यांची पहिली भेट लहानपणी झाली होती.(fans) मेस्सी नंतर फुटबॉल प्रशिक्षणासाठी अर्जेंटिनाहून दूर गेला, परंतु काही काळानंतर दोघे पुन्हा भेटले आणि त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. ॲन्टोनोलाने मेस्सीसोबत राहण्यासाठी तिच्या शिक्षणाचे मोठे बलिदान दिले. सुरुवातीला तिने डेंटिस्ट्रीची पदवी घेण्यासाठी शिक्षण सुरू केले होते, परंतु मेस्सीसोबत बार्सिलोना येथे जाण्यासाठी तिने हा अभ्यासक्रम अर्धवट सोडला.

समोर आलेल्या माहितीनुसार,(fans) रोक्कुझोने अर्जेंटिना येथील नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ रोसारियोमधून ह्युमॅनिटिज आणि सोशल सायन्समध्ये बॅचलर पदवी प्राप्त केली होती. त्यानंतर तिने डेंटिस्ट्रीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रम सुरू केला होता. मात्र, मेस्सीच्या जवळ राहण्यासाठी तिने तो अभ्यास अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला आणि सोशल कम्युनिकेशनमध्ये तिचा अभ्यास पूर्ण केला.ॲन्टोनोला तिच्या पतीच्या फुटबॉल कारकिर्दीत खूप मोठा पाठिंबा देते. मेस्सीचे फुटबॉल सामने पाहण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी ती नेहमी उपस्थित असते. १३ डिसेंबर २०२२ रोजी मेस्सी आणि अर्जेंटिनाचा संघ वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहोचल्यावर तिने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे आपला आनंद व्यक्त केला होता. त्यानंतर काही दिवसांनी, जेव्हा मेस्सीने २०२२ चा वर्ल्ड कप जिंकला, तेव्हा ॲन्टोनोला आणि तिचे तिन्ही मुलगे स्टँड्समध्ये उपस्थित राहून त्याच्या आनंदात सहभागी झाले होते.
हेही वाचा :
जबरदस्त योजना! फक्त व्याजातून मिळणार २.५० लाख रुपये; गुंतवणुकीचं कॅल्क्युलेशन वाचा
‘महानगरपालिका जानेवारी महिन्यात तर जिल्हा परिषद निवडणुका…’; भाजपच्या बड्या नेत्याचे
बाप की हैवान! सावत्र बाप लेकीच्या छातीला स्पर्श करायचा, मिठ्या मारायचा