लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.(possibility) लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहे. नोव्हेंबर महिना संपून आता डिसेंबरचे पहिले १५ दिवसदेखील संपले आहे. तरीही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार असल्याचे सांगितले जात आहे.(possibility) २३ आणि २४ डिसेंबर रोजी महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. म्हणजेच नगरपरिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर लगेचच २-३ दिवसात महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील, असं सांगितलं जात आहे. दरम्यान, याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

लाडकी बहीण योजनेत महिलांना अजूनही नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता अजूनही जमा झाला नाही. (possibility) त्यामागचे मुख्य कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. नगरपरिषद आणि नगरपंचायतीचा निकाल २१ डिसेंबरला लागणार आहे. या कालावधीत योजनेअंतर्गत निधी दिला नाही, असं सांगितलं जात होते. त्यामुळे त्यानंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. याचसोबत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातही पैसे जमा होऊ शकतात, असं सांगण्यात येत आहे. दरम्यान,याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
हेही वाचा :
कमी पाणी पिणाऱ्यांचा मेंदू होतोय हळूहळू छोटा; नव्या अभ्यासातून धक्कादायक बाब समोर
रोजगा हमी योजनेतून गांधींचं नाव हटवणार
सुप्रिया सुळे आता प्रफुल्ल पटेल अमित शहांच्या भेटीला, दिल्लीत काय घडतंय?