जागतिक पातळीवर वाढलेल्या तणावाचा परिणाम आता थेट भारतीय सराफ बाजारावर दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून घसरणीच्या मार्गावर असलेले सोने आणि चांदीचे दर अचानक वाढले असून (gold) त्यामुळे ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः मध्यपूर्वेतील संघर्ष तीव्र झाल्याने गुंतवणूकदारांनी पुन्हा सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळण्यास सुरुवात केली आहे.

अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर परिस्थिती अधिकच चिघळली असून इराणनेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्याचा थेट परिणाम मौल्यवान धातूंवर होत असून सोने आणि चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत आहेत.

आज 17 मार्च रोजी जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात सुमारे 500 रुपयांची वाढ झाली आहे, तर चांदीच्या दरात तब्बल 3 हजार रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. (gold) त्यामुळे सोन्याचे दर पुन्हा उच्चांकाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहेत. सध्या 10 ग्रॅम सोन्यासाठी जीएसटीसह सुमारे 1 लाख 61 हजार 195 रुपये मोजावे लागत आहेत, तर 1 किलो चांदीसाठी ग्राहकांना 2 लाख 66 हजार 770 रुपये खर्च करावे लागत आहेत.

दरवाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांवर आर्थिक ताण वाढत असून सोने खरेदी करण्यापूर्वी अनेकदा विचार करण्याची वेळ आली आहे. लग्नसराई आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ही वाढ अधिकच जाणवू लागली आहे. (gold) तज्ज्ञांच्या मते, जोपर्यंत जागतिक तणाव कमी होत नाही, तोपर्यंत सोने आणि चांदीच्या दरात अशीच अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

धक्कादायक, लग्नास नकार दिल्याने तरुणीला एचआयव्हीचे इंजेक्शन दिले

भर उन्हाळ्यात कोल्हापुरात अवकाळी पाऊस; गारपीटीमुळे नुकसानाची शक्यता

संपूर्ण जग भीषण इंधन टंचाईत अडकलं, पण भारतानं करून दाखवलं, 7 सर्वात मोठ्या गुड न्यूज

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *