राज्यात उद्या नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या उरलेल्या जागांसाठी(holiday) मतदान होणार आहे. ३ डिसेंबर रोजीदेखील नगरपंचायतीसाठी मतदान झाले होते. दरम्यान, काही जागांवर अजूनही मतदान होणे बाकी आहे. ही मतदानाची प्रक्रिया उद्या म्हणजेच २० डिसेंबरला होणार आहे. दरम्यान, उद्या ज्या ठिकाणी मतदान आहे तिथे सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.निवडणूक आयोगाच्या सुधारित कार्यक्रमानुसार यवतमाळ नगरपरिषद, वणी- दिग्रस तसेच पांढरकवडा नगरपरिषद साठी उद्या 20 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

मतदारांना मतदानाचा हक्क निर्विघ्नपणे बजावता (holiday),यावा यासाठी यवतमाळ जिल्हाधिकारी विकास मीना यांनी सुट्टी जाहीर केली आहे. यवतमाळ पालिकेत सर्वच प्रभागात मतदान होणार आहे. दिग्रस येथे तीन प्रभाग तर पांढरकवडा दोन आणि वणी येथे एक असे तीन पालिकेतील सहा जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.त्यामुळे सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.२० डिसेंबरला ज्या ठिकाणी मतदान होणार आहे. त्या ठिकाणी सार्वजनिक सुट्टी असणा आहे तर सर्व नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार आहे.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील सर्व अधिकारी (holiday)आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आलेले आहेत. त्यासोबतच निवडणुकीच्या काळात कोणालाही सुट्ट्या घेता येणार नाहीत, असे प्रशासकांनी सांगितले आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूकीच्या अनुषंगाने प्रशासक जी. श्रीकांत यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात सर्व विभागप्रमुखांसाठी त्यांनी परिपत्रक काढले. निवडणूक होईपर्यंत आता कोणालाही सुट्या घेता येणार नाहीत.महानगरपालिका निवडणूक प्रक्रिया पूर्ण संपेपर्यंत आणि नव्याने परिपत्रक निघेपर्यंत कोणालाही सुट्ट्या घेता येणार नाही असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूकीसाठी नऊ ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय राहणार आहे. प्रत्येक कार्यालयाला निवडणूक साहित्य उपलब्ध करून द्यावे असे निर्देश गुरुवारी एका बैठकीत प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिले.
हेही वाचा :
लिव्ह-इन रिलेशनशिप बेकायदेशीर नाही उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा राजीनामा? सोशल मीडियावर बातमीचा पाऊस
सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा बाथरूम सेल्फी तुफान व्हायरल; फोटो पाहून चाहते थक्क