सज्जनगडजवळ ‘सेल्फी’ घेताना दरीत पडलेल्या युवतीला वाचविण्यात आले यश..

सज्जनगड ठोसेघर मार्गावर बोरणे घाटात ‘सेल्फी(Selfie)’ घेताना खोल दरीत पडलेल्या युवतीला वाचविण्यात स्थानिक ग्रामस्थ, पोलिस, आणि ‘छत्रपती शिवेद्रसिंहराजे रेस्क्यू टीम’ला यश आले आहे. या अपघातात युवती गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ माजवली आहे.

सज्जनगड ठोसेघर मार्गावरील बोरणे गावच्या हद्दीतील ‘मंकी पॉईंट’ परिसरात ही घटना घडली. युवती सेल्फी काढताना असंतुलित होऊन खोल दरीत कोसळली. हे समजताच ठोसेघर संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि सातारा तालुका पोलिसांनी तात्काळ बचाव कार्य सुरू केले. दरीत उतरून युवतीला सुरक्षित बाहेर काढण्यात आले आणि पुढील उपचारासाठी तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सातारा शहरानजीकच्या डोंगर भाग परिसरातील हा दुसरा अपघात आहे, त्यामुळे स्थानिक प्रशासनाने पर्यटकांना आणि नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक ग्रामस्थ, पोलिस, आणि बचाव पथकाच्या तात्काळ कार्यवाहीमुळे युवतीचे प्राण वाचवण्यात यश आले.

हेही वाचा:

चिन टपाक डम डम : छोटा भीममधून आलेला डायलॉग सोशल मीडियावर का व्हायरल होतोय?

लहान मुलांच्या दुधात साखर? तज्ज्ञांचा सल्ला : टाळा गोडवा, वाढवा आरोग्य!

राजघराण्यातील ‘या’ अभिनेत्रीचा MMS लीक; गंभीर आरोप…