आगामी कोल्हापूर व इचलकरंजी महापालिका निवडणुका महायुती म्हणून (Corporation) एकत्र लढण्यावर आज शिक्कामोर्तब झाले. याबाबत कोल्हापुरात भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत निवडणूक रणनिती, उमेदवार निवड आणि जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा करण्यात आली.बैठकीत प्रत्येक प्रभागातील विजयाची क्षमता असलेल्या उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी स्वतंत्र उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही उपसमिती ‘इलेक्टिव्ह मेरिट’च्या आधारे उमेदवारांची प्राथमिक यादी तयार करणार असून, त्यानंतर वरिष्ठ नेत्यांकडे अहवाल सादर केला जाणार आहे.

दरम्यान, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी इचलकरंजी येथे स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. महायुती निश्चित झाली असून, दुसऱ्या टप्प्यात जागा वाटपावर अंतिम निर्णय घेतला जाईल, (Corporation) असे आबिटकर यांनी स्पष्ट केले.कोल्हापुरात सायंकाळी सिंचन भवन येथे झालेल्या बैठकीस पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, प्रा. जयंत पाटील यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी सर्वांनी एकसंध राहण्याचा निर्धार केल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.

उपसमितीत शिवसेनेतर्फे युवासेना पश्चिम महाराष्ट्रप्रमुख ऋतुराज क्षीरसागर, (Corporation)जिल्हा समन्वयक सत्यजित कदम, दक्षिण विधानसभा प्रमुख शारंगधर देशमुख, भाजपतर्फे आमदार अमल महाडिक, प्रा. जयंत पाटील व अन्य पदाधिकारी, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष आदिल फरास, महेश सांवत आणि संदीप कवाळे यांचा समावेश करण्यात आला आहे.ही उपसमिती उद्या ता. २० बैठक घेऊन प्रत्येक प्रभागातील संभाव्य उमेदवारांवर चर्चा करणार आहे.

त्यानंतर पालकमंत्री आबिटकर, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, (Corporation)मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या समितीकडे अहवाल सादर केला जाणार आहे. त्यावरून अंतिम जागा वाटप आणि उमेदवार यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.एकूणच, कोल्हापूर–इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी महायुतीने जोरदार तयारी सुरू केली असून, आगामी काळात राजकीय हालचालींना आणखी वेग येण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा :

नवीन वर्षात गृहिणींना मोठं गिफ्ट! गॅस सिलेंडरच्या किमती कमी होणार?

भारताच्या या राज्यात दारूच्या बाटल्यांना ‘Z+’ सुरक्षा, कारण काय?

‘3 इडियट्स’नंतर आता ‘4 इडियट्स’; आमिर खानच्या चित्रपटात चौथ्या

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *