आगामी इचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने (preparations)राजकीय हालचालींना वेग दिला असून, विरोधी आघाडीला आणखी एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत पक्ष असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. पुढील दोन दिवसांत शहराच्या राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोड घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.भाजपच्या या आक्रमक रणनीतीमुळे विरोधी आघाडीत मोठी अस्वस्थता निर्माण झाली असून, आगामी काळात आघाडी एकसंध ठेवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे. महापालिका निवडणुकीचे वातावरण जसजसे तापत चालले आहे, तसतशा वस्त्रनगरीतील राजकीय घडामोडींनाही वेग येताना दिसत आहे.

दरम्यान, भाजपकडून ‘ऑपरेशन लोटस’ राबविण्यात येत असून, (preparations)त्याला पहिल्या टप्प्यात यश मिळाल्याची चर्चा आहे. शिव-शाहू विकास आघाडीतील प्रबळ चेहरा आणि शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय कांबळे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची माहिती भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. येत्या एक-दोन दिवसांत त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश होण्याची शक्यता असून, त्यामुळे विरोधी आघाडीला मोठा धक्का बसणार आहे.कांबळे यांचे मन वळविण्याचे प्रयत्न विरोधी आघाडीतील नेत्यांकडून सुरू असल्याचेही समजते. मात्र, भाजप नेतृत्वाशी त्यांची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.
याशिवाय, भाजप आणखी एका विरोधी पक्षाच्या शहराध्यक्षाला आपल्या (preparations)गोटात घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा दिवसभर राजकीय वर्तुळात सुरू होती. भाजपच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी या चर्चेला दुजोरा दिल्याने शहरातील राजकीय हालचालींना आणखी धार आली आहे.यामुळे येत्या सोमवारनंतर इचलकरंजीच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘राजकीय भूकंप’ होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. येत्या ३० डिसेंबरपर्यंत विरोधकांना हादरे देण्याच्या दृष्टीने भाजपने रणनीती आखल्याची चर्चा रंगली असून, त्यामुळे विरोधी आघाडीत गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

एकीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्षांसह दहा पक्ष (preparations)एकत्र येऊन शिव-शाहू विकास आघाडी स्थापन करण्यात आली असली, तरी अद्याप जागा वाटपावर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर आघाडीतील एक राष्ट्रीय पातळीवरील पक्ष स्वतंत्र भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत असून, उद्या ता. २० हा पक्ष आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे.एकूणच, इचलकरंजी महापालिका निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे शहरातील राजकारण अधिकच तापत चालले असून, आगामी काही दिवस निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.
हेही वाचा :
नवीन वर्षात गृहिणींना मोठं गिफ्ट! गॅस सिलेंडरच्या किमती कमी होणार?
भारताच्या या राज्यात दारूच्या बाटल्यांना ‘Z+’ सुरक्षा, कारण काय?
‘3 इडियट्स’नंतर आता ‘4 इडियट्स’; आमिर खानच्या चित्रपटात चौथ्या