गेल्या काही दिवसांपासून बांदेकर कुटूंब चर्चेत आहे. सोहम बांदेकरचा नुकताच (news) लग्नसोहळा थाटामाटात पार पडला आहे. गेल्या काही दिवसांपासून बांदेकर कुटुंब चर्चेत असून घरात आनंदाचं वातावरण आहे. असं असताना आनंदावर दुःखाचं सावट पसरलं आहे. बांदेकर कुटुंबातील श्वान सिंबाचं निधन झालं आहे. अभिनेता आणि निर्माता सोहम बांदेकर याने आपला लाडका श्वान ‘सिंबा’ याच्या निधनानंतर १९ डिसेंबर २०२५ रोजी एक अत्यंत भावूक पोस्ट शेअर केली आहे. बांदेकर कुटुंबासाठी सिंबा हा केवळ एक पाळीव प्राणी नसून तो कुटुंबाचा अविभाज्य भाग होता.

सोहमने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले की, “माझ्या 28 वर्षांच्या(news) आयुष्यापैकी जवळपास 17 वर्षे तू माझा जोडीदार, रूममेट आणि माझा सर्वात मोठा सपोर्टर होतास” त्याने सिंबाला आपले ‘निस्वार्थ प्रेम’ देणारा साथीदार मानले आहे. सिंबा बांदेकर कुटुंबात गेल्या १७ वर्षांपासून होता. तो आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर आणि सोहमचा अत्यंत लाडका होता. अलीकडेच सोहमच्या लग्नातही सिंबा उपस्थित होता.

सोहम बांदेकर पोस्टमध्ये म्हणाला की, माझ्या(news) आयुष्याच्या २८ वर्षांपैकी जवळपास १७ वर्षे माझा जोडीदार, माझा रूममेट, माझा आधारस्तंभ, माझा सल्लागार, माझा सर्वात मोठा समर्थक, माझ्या आयुष्याचे प्रेम, त्याने माझी साथ सोडली आहे आणि त्याऐवजी देवांसोबत आपले प्रेम आणि अस्तित्व वाटून घेण्याचा निर्णय घेतला आहे! या बिनशर्त आणि निस्वार्थ प्रेमाबद्दल धन्यवाद! तू नेहमी आमच्यासोबत असशील . तुम्हा सर्वांनी सिम्बावर प्रेम केले. तुम्हा सर्वांनी सिम्बाची मनापासून काळजी घेतली, जरी तुम्ही त्याला भेटला नसलात तरी, त्याला तुमचे प्रेम आणि आपुलकी नेहमीच जाणवत होती! त्यासाठी आम्ही तुमचे आभार मानतो.
हेही वाचा :
वारंवार पायात गोळे येत असतील तर व्हा सावध, या आजाराचे असू शकतील संकेत
‘धुरंधर’ने विदेशातील बॉक्स ऑफिस गाजवलं, ‘या’ देशात करतोय विक्रमी कमाई
चहा-बिस्किटचं कॉम्बिनेशन शरीरारासाठी घातक