आईसाठी आयुष्यातला सर्वात मोठा आणि भावनिक क्षण म्हणजे (arms)आपल्या बाळाला जन्म देणं आणि पहिल्यांदाच त्याला कुशीत घेणं. हा क्षण शब्दांत मांडणं कठीण असतं. लोकप्रिय विनोदी अभिनेत्री भारती सिंग हिने नुकताच असा खास अनुभव पुन्हा एकदा घेतला आहे. 19 डिसेंबर रोजी भारती सिंग दुसऱ्यांदा आई झाली असून तिने पुन्हा एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांनी आपल्या लहान मुलाचं प्रेमानं नाव ‘काजू’ ठेवलं आहे.डिलिव्हरीनंतर बाळाला वैद्यकीय तपासणी आणि निरीक्षणासाठी काही काळ वेगळं ठेवण्यात आलं होतं. तब्बल दोन दिवसांनंतर भारतीला आपल्या नवजात बाळाला कुशीत घेण्याचा आनंद मिळाला. हा क्षण भारतीसाठी अत्यंत भावनिक ठरला. आपल्या लेटेस्ट ब्लॉगमध्ये तिनं हा खास आणि हृदयस्पर्शी क्षण चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

व्हिडीओमध्ये दिसतं आहे की, रुग्णालयातील नर्स जशी बाळाला (arms)भारतीच्या हातात देते, तशी भारती आपल्या भावना आवरू शकत नाही. डोळ्यांत आनंदाश्रू तरळत असताना ती बाळाला प्रेमानं ‘काजू’ म्हणून हाक मारते. हा क्षण पाहून अनेक चाहत्यांच्याही डोळ्यांत पाणी आलं आहे.भावूक होत भारती म्हणते, ‘किती गोड आहे हा… अखेर माझा काजू माझ्या हातात आहे. एकदम सुंदर आणि हेल्दी बाळ आहे, अगदी गोल्यासारखा. फार लवकर तुम्हा सगळ्यांना त्याची झलक दाखवेन. दोन दिवसांनी बाळ हातात आलंय. फक्त एवढीच प्रार्थना आहे की तो नेहमी आनंदी आणि निरोगी राहो.’

दरम्यान, काही दिवसांपूर्वी काही माध्यमांमध्ये अशी चर्चा होती की (arms)‘लाफ्टर शेफ्स सीझन 3’ च्या शूटिंगदरम्यान भारतीची तब्येत अचानक बिघडली आणि तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, या बातम्यांवर भारतीनं स्वतः स्पष्टीकरण दिलं. तिनं सांगितलं की ती शूटिंगवर नव्हती तर मुंबईतील आपल्या घरीच होती. संध्याकाळी सुमारे सहा वाजता तिचा वॉटर बॅग फुटला. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर ती पती हर्ष, कुटुंबीय आणि मोठा मुलगा गोला याच्यासोबत ब्रीच कँडी रुग्णालयात गेली. जिथे तिची सुरक्षित डिलिव्हरी झाली.भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांचा विवाह 3 डिसेंबर 2017 रोजी गोव्यात मोठ्या थाटामाटात पार पडला होता. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघं विवाहबंधनात अडकले. 3 एप्रिल 2022 रोजी त्यांनी आपल्या पहिल्या मुलाचं, लक्ष्य उर्फ ‘गोला’चं स्वागत केलं होतं. आता दुसऱ्या बाळाच्या आगमनानं त्यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.
हेही वाचा :
वारंवार पायात गोळे येत असतील तर व्हा सावध, या आजाराचे असू शकतील संकेत
‘धुरंधर’ने विदेशातील बॉक्स ऑफिस गाजवलं, ‘या’ देशात करतोय विक्रमी कमाई
चहा-बिस्किटचं कॉम्बिनेशन शरीरारासाठी घातक