रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेला (office)‘धुरंधर’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालत आहे. जरी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची गती मर्यादित वाटत असली तरी परदेशात मात्र ‘धुरंधर’ने अक्षरशः वेगळीच झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, युकेसह अनेक परदेशी बाजारपेठांमध्ये हा चित्रपट जबरदस्त कमाई करताना दिसत आहे.सिनेमागृहात प्रदर्शित होऊन या चित्रपटाला 15 दिवस पूर्ण झाले आहेत. ‘धुरंधर’ने परदेशात मोठ्या प्रमाणात कमाई केली आहे. विदेशात बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत या चित्रपटाने तब्बल 700 कोटींचा टप्पा पार करत हा चित्रपट आता 800 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करण्याच्या अगदी उंबरठ्यावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, विक्की कौशलच्या ‘छावा’ या चित्रपटाचा वर्ल्डवाइड लाइफटाइम कलेक्शनचा विक्रम मोडण्याच्या दिशेने ‘धुरंधर’ वेगाने वाटचाल करत आहे.

‘धुरंधर’ने पहिल्याच दिवशी जगभरात 32 कोटी रुपयांची कमाई केली होती.(office) त्यानंतर पहिल्या आठवड्यातच चित्रपटाने 200 कोटींचा टप्पा पार केला. त्यानंतर प्रत्येक दिवशी या चित्रपटाची कमाई वाढतच गेली. बुधवारी जगभरात बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची एकूण कमाई 702 कोटी रुपये झाली होती.सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, शुक्रवारी ‘धुरंधर’ने एकाच दिवशी सुमारे 35 कोटी रुपयांची कमाई केली. गेल्या 15 दिवसांपासून हा चित्रपट दररोज जगभरात 35 ते 40 कोटींच्या दरम्यान कमाई करत आहे. त्यामुळे अवघ्या दोन आठवड्यांतच चित्रपटाचं वर्ल्डवाइड कलेक्शन 737.5 कोटी रुपये इतकं झालं आहे.

परदेशातील बाजारपेठांपैकी अमेरिका हा ‘धुरंधर’साठी सर्वात मजबूत मार्केट ठरत आहे. 5 डिसेंबर 2025 रोजी अमेरिकेत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 12 डिसेंबरपर्यंतच 70 कोटींची कमाई केली होती. त्याचप्रमाणे, इंग्लंडमध्येही या चित्रपटाने आतापर्यंत सुमारे 14 कोटी रुपये कमावले आहेत.फक्त परदेशी बॉक्स ऑफिसचा विचार केला तर ‘धुरंधर’ने विक्की कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाला मागे टाकले आहे. ‘छावा’ने एकूण 91 कोटींची कमाई केली होती. मात्र,(office) आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ने अवघ्या 15 दिवसांपूर्वीच 158 कोटी रुपयांची विदेशात कमाई केली आहे.

हेही वाचा :

नवीन वर्षात गृहिणींना मोठं गिफ्ट! गॅस सिलेंडरच्या किमती कमी होणार?

भारताच्या या राज्यात दारूच्या बाटल्यांना ‘Z+’ सुरक्षा, कारण काय?

‘3 इडियट्स’नंतर आता ‘4 इडियट्स’; आमिर खानच्या चित्रपटात चौथ्या

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *