आपण टीव्हीवर एखादी सिरियल, सिनेमा पाहत असू तर वारंवार येणाऱ्या (restrictions)जाहिरातींचा कंटाळा तुम्हालाही कधी ना कधी आला असेल. जाहिराती किती असाव्या, यावर नियम बनवायला हवेत, अशा चर्चा आपण केल्या असतील. पण आता काळजी करण्याची गरज नाही. कारण भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजे ट्राय ने यासंदर्भात महत्वाचे निर्देश दिले आहेत. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.ट्रायची ही नियमावली 2012 आणि 2013 मधील जाहिरात नियंत्रण आणि सेवा गुणवत्ता नियमांवर आधारित आहे. यात 10 मिनिटे व्यावसायिक जाहिराती आणि 2 मिनिटे चॅनेलच्या स्वतःच्या प्रचाराला परवानगी आहे. सध्या या मर्यादेला न्यायालयात आव्हान देण्यात आलंय. असे असले तरी अंतिम निर्णय येईपर्यंत नियम लागू राहील आणि चॅनेल्सना त्याचे पालन करणेच बंधनकारक आहे, असं ट्रायने म्हटलंय. नुकताच 18 नोव्हेंबर 2025 रोजी कारणे दाखवा नोटिसा दिल्यानंतर ट्रायने बैठक घेऊन हा नियम पुन्हा अधोरेखित केलाय. यानुसार टीव्ही चॅनेल्सना प्रति तास फक्त 12 मिनिटेच जाहिराती दाखवण्याची मर्यादा कठोरपणे पाळण्याचे आदेश दिले आहेत.

ट्रायच्या या निर्णयामुळे आधीच आर्थिक अडचणींमध्ये सापडलेल्या टीव्ही (restrictions) प्रसारकांना मोठा फटका बसू शकतो. 2025 च्या पहिल्या नऊ महिन्यांत जाहिरातींच्या प्रमाणात 10 टक्के घट झाली आहे. चॅनेल्स चालवण्याचा खर्च वाढतोय तर सदस्यता शुल्क आणि जाहिरातीतून येणारे उत्पन्न दोन्ही कमी होतय. डिजिटल प्लॅटफॉर्म्सशी स्पर्धा वाढलीय. जिथे जाहिरातींवर कोणतीही मर्यादा नाही. हा जुना नियम आजच्या बाजारपेठेशी जुळत नाही आणि त्यामुळे त्यांचे नुकसान होईल, असे प्रसारकांचे म्हणणे आहे.दिल्ली उच्च न्यायालयाने या नियमावर दंडात्मक कारवाई करण्यावर तात्पुरती थांबवलीय. पण नियम पूर्णपणे स्थगित केलेला नाही. ट्रायने प्रसारकांना कारणे दाखवा नोटिसा पाठवल्या होत्या आणि त्यांच्या उत्तरांचे मूल्यांकन केले जात आहे. न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत ट्राय नियम लागू ठेवण्यावर ठाम आहे. यामुळे प्रसारकांना सावध राहावे लागेल आणि जाहिरातींचे नियोजन काळजीपूर्वक करावे लागेल, अन्यथा भविष्यात कारवाई होऊ शकते, असे स्पष्ट करण्यात आलंय.

जास्त जाहिरातींमुळे कार्यक्रमात व्यत्यय येतो आणि पाहण्याचा आनंद कमी होतो. (restrictions) त्यामुळे हा नियम दर्शकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. कार्यक्रमांची गुणवत्ता टिकवणे आणि दर्शकांना चांगला अनुभव देणे हा ट्रायचा उद्देश आहे. मात्र प्रसारकांना याचा आर्थिक फटका बसतो. कारण जाहिराती हे त्यांचे मुख्य उत्पन्नाचे स्रोत आहे. वाढत्या खर्चात आणि कमी होणाऱ्या कमाईत अशी अतिरिक्त बंधने सहन करणे कठीण आहे, असे उद्योगातील ज्येष्ठ अधिकारी म्हणतात.ट्रायचा हा निर्णय टीव्ही उद्योगासाठी आव्हानात्मक आहे पण दर्शकांच्या हिताचा आहे. प्रसारकांनी न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहताना नियमांचे पालन करणे सुरक्षित राहील. डिजिटल माध्यमांवर अशी मर्यादा नसल्याने भविष्यात नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. हा नियम केबल टेलीव्हिजन नेटवर्क नियम 1994 मधूनही प्रेरित आहे. प्रसारक आणि ट्राय यांच्यातील हा वाद बाजारपेठेच्या बदलत्या स्वरूपामुळे उद्भवल्याचे सांगितले जाते.
हेही वाचा :
वारंवार पायात गोळे येत असतील तर व्हा सावध, या आजाराचे असू शकतील संकेत
‘धुरंधर’ने विदेशातील बॉक्स ऑफिस गाजवलं, ‘या’ देशात करतोय विक्रमी कमाई
चहा-बिस्किटचं कॉम्बिनेशन शरीरारासाठी घातक