WhatsApp चा वापर करणं हा अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा (trick)भाग झालाय.WhatsApp चॅट्स, व्हिडीओ कॉल आणि कॉल इत्यादींच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधला जातो. बऱ्याचदा लास्ट सिन, प्रोफाइल फोटो, एक टिक, कॉल आणि ग्रुप टेस्ट सारखे संकेत, इत्यादींमुळे तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजू शकतात. सध्या दररोजच्या जीवनात WhatsApp चा वापर खूपच कॉमन झालाय. मात्र अनेकदा असं होतं की कोणत्या व्यक्तीचा प्रोफाइल फोटो तुम्हाला दिसेनासा होतो किंवा त्यांची प्रोफाइल गायब होते. अशातच मनात प्रश्न पडतो की त्यांनी तुम्हाला ब्लॉक केलंय का? कारण WhatsApp वर याबाबत काही नोटिफिकेशन येत नाही. तेव्हा काही सोप्या ट्रिक्स आहेत ज्यामुळे तुम्ही याच कारण ओळखू शकता.

Last Seen किंवा Online Status न दिसणं : जर कोणी तुम्हाला ब्लॉक केलं(trick) असेल तर तुम्हाला त्याचा Last Seen किंवा Online Status दिसणं बंद होतं. तुम्ही वारंवार तपासून सुद्धा या गोष्टींची माहिती तुम्हाला मिळत नाही. अनेकदा यूजर्स त्यांच्या प्रायव्हसी सेटिंग्जमध्ये जाऊन ‘लास्ट सीन’ लपवू शकतात, म्हणून हे फक्त एक प्राथमिक संकेत म्हणून विचारात घ्या. प्रोफाइल फोटो न दिसणे : जर कोणी तुम्हाला ब्लॉक केले असेल, तर तुम्हाला त्यांच्या प्रोफाइल फोटोऐवजी एक रिकामा राखाडी आयकॉन दिसेल. जरी त्यांनी त्यांचा डिस्प्ले फोटो अपडेट केला तरी तुम्हाला तो बदल दिसणार नाही.

WhatsApp कॉल कनेक्ट न होणं : जर तुमचा WhatsApp कॉल रिंग (trick)होण्याऐवजी फक्त कॉलिंग दाखवत असेल आणि नंतर आपोआप डिस्कनेक्ट झाला तर समोरच्या व्यक्त्तीने तुम्हाला ब्लॉक केलं हे त्याच चिन्ह आहे. मेसेजमध्ये फक्त एक टिक दिसणं : मेसेज सेंड केल्यावर फक्त एक टिक दिसणं हे ब्लॉक होण्याचे सर्वात स्पष्ट लक्षण आहे. सामान्यतः एक टिक म्हणजे संदेश पाठवला गेला आहे, दोन राखाडी टिक म्हणजे संदेश पोहोचला आहे आणि दोन निळ्या टिक म्हणजे संदेश वाचला गेला आहे.मात्र जर कोणी तुम्हाला ब्लॉक केलं असेल तर तुम्हाला फक्त मेसेज सेंड केल्याची टिक दिसेल. तो व्यक्ती ऑनलाईन असून सुद्धा तुम्हाला मेसेज पोहोचल्याचा दोन टिक दिसणार नाहीत. ब्लॉक करणे हा वैयक्तिक प्रायव्हसीचा निर्णय आहे. कधीकधी तो तात्पुरता असू शकतो किंवा जाणूनबुजून अंतर ठेवण्याऐवजी प्रायव्हसी सेटिंग्जमधील बदलाचा परिणाम असल्याचे दिसून येते.
हेही वाचा :
वारंवार पायात गोळे येत असतील तर व्हा सावध, या आजाराचे असू शकतील संकेत
‘धुरंधर’ने विदेशातील बॉक्स ऑफिस गाजवलं, ‘या’ देशात करतोय विक्रमी कमाई
चहा-बिस्किटचं कॉम्बिनेशन शरीरारासाठी घातक