पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि(meeting)शिवसेना शिंदे गट यांनी महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही पक्षांनी एकत्रित लढण्यावर शिक्कामोर्तब केले असले तरी जागावाटपावरून अद्याप पेच कायम आहे. तर दुसरीकडे पुण्याच्या राजकारणात आज मोठी आणि निर्णायक उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या शरद पवार आणि अजित पवार गटाच्या स्थानिक युतीवर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सकाळी पुण्यात घडलेल्या वेगवान घडामोडींमुळे राजकीय वर्तुळाचे लक्ष बारामती हॉस्टेलकडे लागले आहे.

आज २६ डिसेंबर सकाळी शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली.(meeting) या बैठकीनंतर लगेचच शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे आणि विशाल तांबे हे अजित पवार यांच्या भेटीसाठी पुण्यातील बारामती हॉस्टेलवर दाखल झाले आहेत. दोन्ही गटांतील नेत्यांमध्ये सध्या चर्चा सुरू असून, यातून पुण्यातील स्थानिक राजकारणासाठी युतीचा मार्ग मोकळा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.विशेष म्हणजे, तीन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका वक्तव्यात २६ तारखेला आज दोन राष्ट्रवादीच्या युती संदर्भात पुण्यात अंतिम निर्णय घेतला जाईल, असे सुतोवाच केले होते. त्यांच्या या डेडलाईननुसार आजची ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राने शरद पवार आणि अजित पवार (meeting)यांच्यातील राजकीय दुरावा आणि त्यानंतर झालेली पक्षाची फूट पाहिली आहे. अजित पवारांनी वेगळी चूल मांडल्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. मात्र, पुण्याचे राजकारण हे नेहमीच पवारांच्या दोन्ही गटांच्या प्रतिष्ठेचा विषय राहिले आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, भाजपसारख्या तगड्या विरोधकाला रोखण्यासाठी आणि पुण्याच्या गडावर पुन्हा वर्चस्व मिळवण्यासाठी ही जवळीक राजकीय अपरिहार्यता मानली जात आहे. दुरावलेली नाती आता सत्तेच्या गणितासाठी पुन्हा जुळताना दिसत आहेत.

पुणे महानगरपालिकेची निवडणूक गेल्या काही काळापासून प्रलंबित आहे. (meeting)प्रशासक राजवट असली तरी लवकरच निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. पुण्यात जवळपास १७३ जागांसाठी प्रभाग रचनेनुसार बदल होऊ शकतो ही लढाई होणार आहे.जरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तरी सर्वात मोठा पेच ‘जागावाटपाचा’ असणार आहे. दोन्ही गटांकडे इच्छुक उमेदवारांची मोठी फौज आहे. कोणाला किती जागा मिळणार? विद्यमान नगरसेवकांचे काय होणार? आणि बंडखोरी कशी रोखली जाणार? हे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. आज युतीची घोषणा झाली तरी, प्रत्यक्ष जागावाटपाचा फॉर्म्युला कसा ठरतो, यावरच या युतीचे भवितव्य अवलंबून असेल. थोडक्यात, आजच्या या बैठकीतून पुण्यातील ‘पवार पॉवर’ पुन्हा एकवटणार का, हे काही तासांतच स्पष्ट होईल.

हेही वाचा :

पार्टी ऑल नाईट! 31st रात्रभर गाजणार; पब, रेस्टॉरंट पहाटेपर्यंत

१ जानेवारी २०२६ पासून ६ नियम बदलणार, कर्मचाऱ्यांपासून ते

घराच्या बाल्कनी आणि गॅलरीत कबुतरं येऊ नयेत यासाठी सोपे, मुघल

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *