नवीन वर्ष 2026 सुरू होण्यास आता काहीच दिवस उरले आहेत.(closed)नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिक आर्थिक व्यवहार, वाहन किंवा मालमत्ता खरेदीचे नियोजन करत असतात. मात्र, जानेवारी 2026 मध्ये बँकांना तब्बल 16 दिवस सुट्टी असल्याने ग्राहकांनी आधीच नियोजन करणे आवश्यक ठरणार आहे.रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने आपल्या अधिकृत वेबसाईटवर जानेवारी 2026 मधील बँक सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. विशेष म्हणजे या सर्व सुट्ट्या संपूर्ण देशात एकाच दिवशी लागू होणार नाहीत. राज्यनिहाय सण, उत्सव आणि स्थानिक कारणांनुसार बँकांना सुट्ट्या असणार आहेत.

जानेवारी 2026 मध्ये बँका या दिवशी बंद राहणार :
1 जानेवारी 2026 – नववर्ष व गान-नगाई
मिझोराम, मणिपूर, नागालँड, मेघालय, अरुणाचल प्रदेश, (closed)सिक्कीम, पश्चिम बंगाल
2 जानेवारी 2026 – मन्नम जयंती
केरळ, मिझोराम
3 जानेवारी 2026 – हजरत अली जयंती
उत्तर प्रदेश
12 जानेवारी 2026 – स्वामी विवेकानंद जयंती
पश्चिम बंगाल
14 जानेवारी 2026 – मकर संक्रांती / माघ बिहू
आसाम, ओडिशा, अरुणाचल प्रदेश
15 जानेवारी 2026 – उत्तरायण पुण्यकाळ, पोंगल, माघे संक्रांती
तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा
16 जानेवारी 2026 – तिरुवल्लुवर दिन
तामिळनाडू
17 जानेवारी 2026 – उझावर थिरुनल
तामिळनाडू
23 जानेवारी 2026 – नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती
पश्चिम बंगाल, ओडिशा, त्रिपुरा
26 जानेवारी 2026 – प्रजासत्ताक दिन
संपूर्ण देशातील सर्व बँका बंद
साप्ताहिक सुट्ट्यांमुळे बंद राहणाऱ्या तारखा :
4 जानेवारी – रविवार
10 जानेवारी – दुसरा शनिवार
11 जानेवारी – रविवार
18 जानेवारी – रविवार
24 जानेवारी – चौथा शनिवार
25 जानेवारी – रविवार

ग्राहकांनी काय लक्षात ठेवावे? :
जानेवारी 2026 मध्ये सुट्ट्यांची संख्या जास्त असल्याने चेक क्लीअरन्स, (closed)कर्ज प्रक्रिया, कॅश व्यवहार यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे वेळेआधी पूर्ण करण्याचा सल्ला दिला जात आहे. तसेच, नेट बँकिंग, UPI, ATM सेवा मात्र सुरू राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा :
या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान, गुंतवणूकदार मालामाल, अदानी समूहाशी
मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! या देशातील हॉटेल रूममध्ये बिअर मिळते
सावधान! १ जानेवारी २०२६ आधी ‘ही’ कामं उरकून घ्या, अन्यथा बसेल फटका