टेक कंपनी Apple त्यांचा आगामी आयफोन लाँच करण्याची तयारी करत आहे.(Features)आगामी आयफोन 18 सिरीज 2026 मध्ये भारतात लाँच केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र लाँचिंगपूर्वीच या सिरीजमधील आयफोन 18 प्रो मॅक्स चे काही फीचर्स लिक झाले आहेत. त्यामुळे या आयफोन मॉडेलबाबत लोकांची उत्सुकत प्रचंड वाढली आहे. हा आयफोन लाँच होण्यासाठी अद्यापही बराच काळ काही शिल्लक आहे. मात्र तरी देखील हा आयफोनच्या फीचर्सची चर्चा सुरु झाली आहे. आयफोन 18 प्रो मॅक्सचे डिझाईन, लाँच डेट आणि फीचर्सबाबत काही लिक्स समोर आले आहेत.लीक्सवर विश्वास ठेवला तर असं सांगितलं जात आहे की, आयफोन 18 प्रो मॅक्स भारतात सप्टेंबर 2026 च्या दुसऱ्या आठवड्यात लाँच केला जाऊ शकतो. या ईव्हेंटमध्ये Apple त्यांचे दुसरे प्रिमियम डिव्हाईस देखील लाँच करू शकते. यामध्ये iPhone Fold चा देखील समावेश असणार आहे. लिक्समध्ये या आयफोन मॉडेलच्या किंमतीचा देखील खुलासा करण्यात आला आहे. असं सांगितलं जात आहे की, आयफोन 18 प्रो मॅक्सचे 256GB स्टोरेज व्हेरिअंट भारतात 1,64,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केले जाण्याची शक्यता आहे.

आगामी आयफोनचे डिझाईन बदलले जाणार नाही. (Features)लीक्सनुसार आयफोन 18 प्रो मॅक्सचे डिझाईन काही प्रमाणात आयफोन 17 प्रो मॅक्सप्रमाणेच आहे. मात्र कंपनी यामध्ये नवीन रंग जोडण्याची शक्यता आहे. आगामी आयफोन 18 प्रो मॅक्समध्ये देखील तेच प्रीमियम फिनिश, फ्लॅट एजेस आणि मजबूत बॉडी दिली जाण्याची शक्यता आहे.आयफोन 18 प्रो मॅक्समधील कॅमेरा अपग्रेड केला जाणार आहे. लीक्सनुसार यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाण्याची शक्यता आहे. ज्यामधील तिन्ही सेंसर 48MP असणार आहेत. यामध्ये एक 48MP चा प्राइमरी कॅमेरा, एक 48MP चा पेरिस्कोप टेलीफोटो लेंस आणि एक 48MP चा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा असण्याची शक्यता आहे.

फ्रंट कॅमेराबद्दल बोलायचं झालं तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी (Features)या आयफोनमध्ये 24MP चा कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे. कॅमेरा अपग्रेड कंटेट क्रिएटर्ससाठी खास ठरणार आहे.आयफोन 18 प्रो मॅक्समध्ये प्रोमोशन सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे, 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करणार आहे. याचा अर्थ असा आहे की, स्क्रॉलिंग, गेमिंग आणि व्हिडीओ पाहण्याा अनुभव अधिक स्मूद आणि प्रिमियम होणार आहे. कंपनी नेहमीच डिस्प्ले क्वालिटीवर लक्ष देते.आयफोन 18 प्रो मॅक्समध्ये Apple चा पुढील जेनरेशन A20 Pro चिपसेट दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा प्रोसेसर केवळ वेगवानच नाही तर एआयशी संबंधित कामांमध्ये पूर्वीपेक्षा अधिक सक्षम मानला जातो.

हेही वाचा :

या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान, गुंतवणूकदार मालामाल, अदानी समूहाशी

मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! या देशातील हॉटेल रूममध्ये बिअर मिळते

सावधान! १ जानेवारी २०२६ आधी ‘ही’ कामं उरकून घ्या, अन्यथा बसेल फटकाEdit

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *