कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अत्यंत अनपेक्षित वळण पाहायला मिळाले आहे.(withdrawn)भारतीय जनता पक्ष कडून आपला उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर अवघ्या २४ तासांत कृष्णराज महाडिक यांनी निवडणूक रिंगणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.आपल्या निर्णयाचे स्पष्टीकरण देताना कृष्णराज महाडिक यांनी सांगितले की, भाजप ही शिस्तीने चालणारी संघटना असून पक्षाच्या आदेशाचे पालन करणे हे प्रत्येक कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे. महायुती एकत्रितपणे ही निवडणूक लढवत असल्यामुळे इच्छुकांची संख्या मोठी आहे. अशा परिस्थितीत सामान्य कार्यकर्त्यांना प्रतिनिधीत्वाची संधी मिळावी या उदात्त हेतूने आपण उमेदवारी मागे घेत असल्याचे त्यांनी नमूद केले.

ज्येष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार आपण आधी उमेदवारी जाहीर केली होती,(withdrawn) मात्र आता बदलेल्या राजकीय परिस्थितीत पक्षीय हिताला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केवळ आपले नाव उमेदवारीसाठी चर्चेत आले, हीच आपल्यासाठी समाधानाची बाब असून भविष्यातही जनसेवेचे व्रत सुरूच राहील, अशी ग्वाही त्यांनी आपल्या समर्थक आणि कुटुंबातील सदस्यांना दिली.उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी कोल्हापूर शहराच्या नियोजनबद्ध विकासाचा आराखडा मांडला होता. टाऊन प्लॅनिंग च्या माध्यमातून शाश्वत सुधारणा करणे आणि एकाच कामावर वारंवार होणारा सरकारी निधीचा अपव्यय थांबवणे, ही त्यांची मुख्य उद्दिष्टे होती.

खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक (withdrawn)लढवण्याची त्यांची तयारी होती, परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी आता माघार घेतली आहे.शहरात खेळांच्या माध्यमातून शिस्त आणि जीवनमूल्ये रुजवण्याचा त्यांचा मानस असून, विरोधकांच्या आरोपांकडे दुर्लक्ष करून केवळ विकासकामांवर लक्ष केंद्रित करण्याची त्यांची भूमिका होती. जरी ते स्वतः निवडणूक लढवणार नसले, तरी महायुतीच्या इतर उमेदवारांच्या विजयासाठी ते सक्रिय राहतील असे संकेत त्यांनी दिले आहेत. कोल्हापूरच्या सर्वांगीण प्रगतीसाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात ताळमेळ असणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

हेही वाचा :

या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान, गुंतवणूकदार मालामाल, अदानी समूहाशी

मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! या देशातील हॉटेल रूममध्ये बिअर मिळते

सावधान! १ जानेवारी २०२६ आधी ‘ही’ कामं उरकून घ्या, अन्यथा बसेल फटकाEdit

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *