कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
पक्षीय विचारांची एक बैठक असते. त्याच्याशी सुसंगत असे नेत्यांनी राजकारण करावयाचे असते.(principles)पण गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील काही नेते पक्षीय नव्हे तर स्वतःचा अजेंडा राबवताना दिसू लागले आहेत. त्यासाठी त्यांनी पक्षीय विचार सोडून दिलेला आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने
राजकीय पक्षांचे संधी साधू राजकारण सर्वसामान्य जनतेने पाहिले आहे.बुधवारी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती झाली. हे दोन्ही पक्ष वेगवेगळे आहेत. राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडून नवनिर्माण सेना स्थापन केलेली नाही.त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांची झालेली युती अनैसर्गिक आहे असे कोणी म्हणणार नाही. स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी हे दोन्ही बंधू एकत्र आले आहेत.
अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

पण त्यांनी अजित दादा पवार आणि एकनाथ शिंदे यांनाजवळ केले आहे (principles)म्हणजे भाजपचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांनी ही केलेली कृती आहे असे म्हणता येईल.पुण्यातील महापालिका निवडणुकीसाठी शरद पवार आणि अजित दादा पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार आहेत. महायुती मध्ये घटक पक्ष म्हणून स्वतंत्र अस्तित्व ठेवून पुण्यात महाविकास आघाडी मधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर युती करणे म्हणजे संधी साधू राजकारण
आहे असे म्हणता येईल.दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस मधील पुण्यातील स्थानिक नेते जागा वाटपांच्या संदर्भात वाटाघाटी करत आहेत. आणि सुप्रिया सुळे यांना त्याची अजिबात कल्पना नाही असे कसे म्हणता येईल? अजित दादा पवार यांच्याकडून एकत्र लढण्याच्या संदर्भात काही प्रस्ताव आलेला आहे हे मला माहीत नाही. पण आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे त्याबद्दल निर्णय घेतील असे सुप्रिया यांनी स्पष्ट केले आहे. याचा अर्थ त्या स्पष्टपणे काहीच बोलत नाहीत.
शरद पवार यांनी मोठ्या कष्टाने वाढवलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा पवार यांनी हायजॅक केलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे.इतकेच नाही तर पक्षाचे अधिकृत घड्याळ हे चिन्हही त्यांनी निवडणूक आयोगाकडून मिळवले आहे. ज्यांच्याकडून पक्षच काढून घेतला त्यांच्याशीच निवडणुकीसाठी हात मिळवणी करायची याला संधी साधून राजकारण म्हणतात आणि ते त्यांनी केलेले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत आहेत याला दुजोरा दिला आहे.हे एकत्रिकरण फक्त पुण्यातील निवडणुकीपुरतं मर्यादित आहे ते कायमस्वरूपी नाही असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असतील तर आम्ही स्वतंत्रपणे लढू असे काँग्रेसचे एक नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येणे हे त्यांना मान्य नाही असे दिसते. यापूर्वीही काही घडलेल्या घटनांमुळेशरद पवार यांनीच स्थापन केलेल्या महाविकास आघाडीमध्ये सर्व काही ठीकठाक आहे असे म्हणता येणार नाही.

महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरे(principles)यांच्या शिवसेनेने राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची घरोबा केला असल्यामुळे मुंबई महापालिका निवडणुका काँग्रेस स्वतंत्रपणे लढवणार आहे हे यापूर्वीच काँग्रेसचे प्रभारी रमेश चेनिथला यांनी यापूर्वीच स्पष्टपणे सांगितले आहे. नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय काँग्रेसने सुद्धा स्थानिक पातळीवर “असंगाशी संग” केलेला आहे. त्यांचंही स्थानिक पातळीवर राजकारण संधीसाधूचं ठरलेलं आहे.एकूणच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक महानगरामध्ये फोडाफोडीचा राजकारण जोरात सुरू झालेल आहे. त्यामध्ये भाजप आघाडीवर आहे. निवडून येण्याची दाट शक्यता असलेल्या कार्यकर्त्यांनाच फोडले जात आहे. पळवा पळवीचे हे राजकारण संधी साधून घेण्याचं आहे. संधी साधू आहे. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
हेही वाचा :
पार्टी ऑल नाईट! 31st रात्रभर गाजणार; पब, रेस्टॉरंट पहाटेपर्यंत
१ जानेवारी २०२६ पासून ६ नियम बदलणार, कर्मचाऱ्यांपासून ते
घराच्या बाल्कनी आणि गॅलरीत कबुतरं येऊ नयेत यासाठी सोपे, मुघल