नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सामान्य नागरिकांसह व्यापाऱ्यांना महागाईचा (cylinder) मोठा धक्का बसला आहे. 1 जानेवारी 2026 पासून तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ केली असून, देशभरात व्यावसायिक गॅस सिलिंडर महाग झाला आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसारख्या प्रमुख शहरांमध्ये ही दरवाढ लागू झाली असून, त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, कॅन्टीन आणि लहान व्यावसायिकांवर आर्थिक ताण वाढण्याची शक्यता आहे. नवीन वर्षाची सुरुवात होत असतानाच झालेल्या या दरवाढीमुळे महागाईचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे, ही वाढ 19 किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलिंडरवर लागू करण्यात आली असून, प्रति सिलिंडर तब्बल 111 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे 14 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

दरवाढीनंतर देशातील प्रमुख महानगरांमध्ये व्यावसायिक एलपीजी (cylinder) सिलिंडरचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत 1531.50 रुपयांना मिळणारा 19 किलोचा कमर्शियल एलपीजी सिलिंडर आता 1642.50 रुपयांना मिळणार आहे. दिल्लीमध्ये याची किंमत 1580.50 रुपयांवरून थेट 1691.50 रुपये करण्यात आली आहे, ज्यामुळे राजधानीतील व्यावसायिकांवर खर्चाचा बोजा वाढणार आहे.कोलकातामध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 1684 रुपयांवरून वाढवून 1795 रुपये करण्यात आली आहे. तर चेन्नईमध्ये याची किंमत 1739.50 रुपयांवरून 1849.50 रुपये इतकी झाली आहे. या दरवाढीचा थेट परिणाम हॉटेल व्यवसाय, खाद्यपदार्थ विक्रेते आणि लघुउद्योगांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कमर्शियल गॅस महाग झाला असला तरी घरगुती गॅस वापरणाऱ्या ग्राहकांसाठी मात्र दिलासादायक चित्र आहे. सध्या देशातील बहुतेक शहरांमध्ये घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर 850 रुपये ते 960 रुपयांच्या दरम्यान स्थिर आहेत. दिल्लीमध्ये घरगुती एलपीजी सिलिंडर 853 रुपयांना मिळत असून, मुंबईमध्ये याची किंमत 852.50 रुपये आहे. लखनऊमध्ये घरगुती सिलिंडर 890.50 रुपयांना उपलब्ध आहे, तर अहमदाबादमध्ये याची किंमत 860 रुपये आहे. हैदराबादमध्ये घरगुती एलपीजी सिलिंडर 905 रुपयांना मिळत असून, वाराणसीमध्ये याची किंमत 916.50 रुपये नोंदवण्यात आली आहे. पटनामध्ये मात्र घरगुती गॅसचा दर तुलनेने जास्त असून, तो 951 रुपये इतका आहे.

एलपीजी सिलिंडरच्या किमती ठरवताना अनेक घटकांचा विचार केला जातो. (cylinder) मुख्यत्वे इम्पोर्ट पॅरिटी प्राईस या सूत्रावर सिलिंडरच्या दरांची गणना केली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारातील गॅसचे दर, डॉलर आणि रुपयामधील विनिमय दर, वाहतूक खर्च, विमा आणि विविध करांचा यामध्ये समावेश असतो. याशिवाय, प्रत्येक राज्यामध्ये स्थानिक कर आणि वितरणाशी संबंधित खर्च वेगवेगळे असल्यामुळे शहरानुसार एलपीजी सिलिंडरच्या किमतींमध्ये फरक पाहायला मिळतो. त्यामुळेच एकाच वेळी दरवाढ झाली तरी प्रत्येक शहरातील दर वेगवेगळे असतात.

हेही वाचा :

नवीन वर्षात ओली पार्टी न पडो महागात! घरात किती दारु ठेवू शकता? दंडासह

हिवाळ्यात दही की रायता आरोग्यासाठी काय लाभदायक? काय सांगतात तज्ज्ञ?

कपडे काढ अन् नाच..; सेटवर अभिनेत्रीसोबत गैरवर्तन; दिग्दर्शकाची

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *