नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अनेक महत्त्वाचे बदल झाले आहे.(changes) अशातच एक बातमी सर्वसामान्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे. सीएनजी गॅसच्या किंमती घसरल्या आहेत. सीएनजीच्या किंमती कमी झाल्याने सर्वसामान्यांना फायदा झाला आहे. वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.नवीन वर्षाच्या सुरुवातीला सीएनजीसोबतच पीएनजीच्या दरातदेखील कपात झाली आहे. सीएनजीचे दर २ रुपयांनी घसरले आहेत तर पीएनजीचे दर ०.७० रुपयांनी घसरले आहेत. यामुळे वाहनधारकांसोबतच गृहिणींनादेखील फायदा होणार आहे.

देशभरात अनेक ठिकाणी सीएनजीचे दर घसरले आहेत.(changes) पुण्यात सीएनजीचे दर १ रुपयांनी स्वस्त झाले आहेत. पुण्यात हे दर ९१.५० रुपये आहेत. काल मध्यरात्री हे दर जाहीर करण्यात आले.आजपासून हे दर लागू झाले आहेत.एकीकडे सीएनजीच्या किंमती कमी झाल्या आहे पण दुसरीकडे एलपीजी गॅसच्या किंमतीत बदल झाला आहे. एलपीजी गॅसच्या किंमतीत १११ रुपयांनी वाढ झाली आहे. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या १९ किलो वजनाचा एलपीजी सिलिंडर १६९१.५० रुपयांना मिळणार आहे.

एसी आणि फ्रिजच्या किंमतींमध्येही वाढ झाली आहे. (changes)बीई रेटिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे.सीएनजीच्या किंमती जरी घसरल्या असल्या तरीही पेट्रोलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोलचे दर स्थित आहेत. मुंबईत सध्या पेट्रोलची किंमत १०३.५४ रुपये प्रति लिटर आहेत. अनेक राज्यांमध्ये पेट्रोलचे दर किंचिंत महागले आहेत. परंतु अनेक राज्यात स्थिर आहेत. पेट्रोलचे दर वाढत आहेत. हे दर कमी करण्याची मागणी केली जात आहे. परंतु याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.

हेही वाचा :

नवीन वर्षात ओली पार्टी न पडो महागात! घरात किती दारु ठेवू शकता? दंडासह

हिवाळ्यात दही की रायता आरोग्यासाठी काय लाभदायक? काय सांगतात तज्ज्ञ?

कपडे काढ अन् नाच..; सेटवर अभिनेत्रीसोबत गैरवर्तन; दिग्दर्शकाची

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *