राज्यातील लाखो महिलांसाठी 2026 या वर्षाच्या शेवटच्या दिवशी एक (credited) आनंदाची बातमी समोर आली आहे. अनेक दिवसांपासून ज्या हप्त्याची लाडक्या बहिणी आतुरतेने वाट पाहत होत्या, तो हप्ता अखेर त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 31 डिसेंबर रोजी राज्य सरकारकडून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आला असून, अनेक महिलांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे मेसेज येऊ लागले आहेत.वर्ष 2025 चा शेवट गोड करत राज्य सरकारने लाडक्या बहिणींना मोठी भेट दिली आहे. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार, याबाबत महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, बुधवारी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यभरातील पात्र महिलांच्या खात्यात थेट डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे महिलांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपयांचा हप्ता जमा करण्यात येत आहे. (credited)विशेष म्हणजे, ज्या महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे आणि ज्यांची डीबीटी प्रक्रिया पूर्ण आहे, त्यांच्या खात्यात प्राधान्याने ही रक्कम वर्ग करण्यात आली आहे. अनेक महिलांना मोबाईलवर एसएमएस अलर्ट मिळाल्याने योजनेचा लाभ मिळाल्याची खात्री झाली आहे.नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे एकत्रित 3000 रुपये मिळतील, अशी अपेक्षा अनेक महिलांना होती. मात्र, सध्या नोव्हेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. उर्वरित हप्ता पुढील प्रक्रियेनंतर जमा होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महिलांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
काही महिलांच्या मोबाईलवर अद्याप पैसे जमा झाल्याचा मेसेज आलेला नाही.(credited) मात्र, यामुळे घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. अनेकदा बँक सर्व्हरवरील तांत्रिक अडचणींमुळे एसएमएस येण्यास विलंब होतो. अशा परिस्थितीत महिलांनी थेट बँक पासबुक अपडेट करून किंवा मोबाईल बँकिंग, यूपीआय अॅपच्या माध्यमातून खाते तपासण्याचा सल्ला दिला जात आहे.तसेच, एटीएममध्ये जाऊन शेवटची ट्रान्झॅक्शन हिस्ट्री पाहूनही खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही, याची खात्री करता येते. काही बँकांकडून बॅलन्स तपासण्यासाठी टोल फ्री क्रमांक किंवा मिस्ड कॉलची सुविधा दिली जाते. त्यामुळे एसएमएस न आल्यासही महिलांनी स्वतः खात्री करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लाडकी बहीण योजनेबाबत महिलांसाठी एक महत्त्वाचा इशाराही देण्यात आला आहे.(credited) या योजनेचा लाभ सुरू राहण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. 31 डिसेंबर ही ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख असून, ज्या महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना 1 जानेवारी 2026 पासून योजनेचा लाभ मिळणे कायमचे बंद होऊ शकते. नियमानुसार, ज्या महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही किंवा ज्यांची ई-केवायसी अपूर्ण आहे, त्यांना ‘अपात्र’ ठरवले जाण्याची शक्यता आहे. अशा महिलांना पुढील काळात लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे सर्व पात्र महिलांनी वेळेत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
हेही वाचा :
नवीन वर्षात ओली पार्टी न पडो महागात! घरात किती दारु ठेवू शकता? दंडासह
हिवाळ्यात दही की रायता आरोग्यासाठी काय लाभदायक? काय सांगतात तज्ज्ञ?
कपडे काढ अन् नाच..; सेटवर अभिनेत्रीसोबत गैरवर्तन; दिग्दर्शकाची