राज्यात थंडीचे वातावरण सुरु असताना पावसाने देखील हजेरी लावली आहे.(rained) मुंबईसह अनेक भागात रिमझिम सरी कोसळल्या. आज देखील काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला. जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच जानेवारी महिन्यात देशात कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याने थंडी कायम राहण्याचा अंदाज आहे. मराठवाडा, विदर्भासह, अनेक जिल्ह्यांत थंडीच्या लाटांचा कालावधी अधिक राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

जानेवारी ते मार्च महिन्यातील पावसाचा, तसेच जानेवारी महिन्यातील पाऊस (rained)आणि कमाल व किमान तापमानाचा अंदाज हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहापात्रा यांनी गुरूवारी जाहीर केला. यंदा नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच किमान तापमानात घट झाल्याने राज्यात गारठा वाढला.

डिसेंबर महिन्यातदेखील तीव्र थंडी अनुभवायला मिळाली. (rained)सध्या राज्यात अंशतः ढगाळ हवामान होत असून, गारठा काहीसा कमी झाला आहे. जानेवारी महिन्यात देशाच्या बहुतांशी भागात सरासरीच्या तुलनेत कमी किमान तापमान राहणार असल्याने थंडी कायम राहण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र वगळता उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे.IMD नुसार पुढील तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये देशात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. जानेवारीत महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी असले तरी यंदा राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान ऐन थंडीच्या काळात हलक्या स्वरूपाचा पाऊस बरसल्याने नागरिक देखील हैराण झाले आहेत.
हेही वाचा :
नोकरीला कंटाळलात? 2026 मध्ये पैसे कमावण्याच्या या आहेत 5 बेस्ट आयडिया
२०२६ मध्ये मोठे आर्थिक संकट? बाबा वेंगाच्या भविष्यवाण्यांनी जगभरात माजली
२०२६ मध्ये मोठे आर्थिक संकट? बाबा वेंगाच्या भविष्यवाण्यांनी जगभरात माजली