छत्रपती संभाजी नगर मध्ये 2 मृत शिक्षकांना महापालिकेने निवडणूक (duty) ड्युटी लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 3 आणि 13 महिन्यांपूर्वी मृत झालेल्या दोन शिक्षकांना प्रशिक्षणासाठी गैरहजर राहिल्याबद्दल नोटीसही बजावत कारवाईचा इशाराही दिला आहे. पैठण तालुक्यातील संभाजी कर्डिले यांचे 3 महिन्यांपूर्वी, तर राजेश बसवे यांचे 13 महिन्यांपूर्वी निधन झाले. असे असतानाही त्यांना निवडणुकीच्या कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर चुकीची उपरती न झालेल्या प्रशासनाने आता या मृत शिक्षकांना निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर राहिल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावत हलगर्जीपणाचा कळस गाठला. आयुक्तांनी दिलेल्या पत्रात म्हटले की, निवडणूक कामात हलगर्जीपणा दाखवल्याबाबतचा खुलासा नोटीस मिळाल्यापासून २४ तासांच्या आत सादर करावा, अन्यथा कारवाई करण्यात येईल. या आधीही दोन दिवंगत शिक्षकांवर महापालिका निवडणुकीसाठी मतदान अधिकारीपदाची जबाबदारी सोपवल्याचा प्रकार समोर आला होता.

मृत शिक्षकांची नावे:
संजय गुळवे: यांचे वर्षभरापूर्वीच निधन झाले होते.
वंदना सोळुंके: यांचेही काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते.

प्रशासनाचा निष्काळजीपणा
या प्रकारामुळे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडे कर्मचाऱ्यांची (duty)अद्ययावत माहिती नसल्याचे उघड झाले. मृतांच्या नावावर निवडणूक ड्युटीचे आदेश निघाल्याने शिक्षक संघटना आणि नातेवाईकांकडून संताप व्यक्त करण्यात आला.

कारवाई आणि दुरुस्ती:
हा प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनाने आपली चूक मान्य केली. (duty)या प्रकरणातील तांत्रिक त्रुटी सुधारण्याचे आणि भविष्यात असा प्रकार घडू नये यासाठी डेटा अपडेट करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते. अशा प्रकारच्या घटनांमुळे निवडणूक प्रक्रियेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. अधिकृत माहितीसाठी तुम्ही छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

हेही वाचा :

नोकरीला कंटाळलात? 2026 मध्ये पैसे कमावण्याच्या या आहेत 5 बेस्ट आयडिया

२०२६ मध्ये मोठे आर्थिक संकट? बाबा वेंगाच्या भविष्यवाण्यांनी जगभरात माजली

Sangli Crime: कॉलेजसमोरुन निघाला, चौघांनी अडवलं अन्… सांगलीत 22

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *