रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 19’ मधील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या स्पर्धकांपैकी (bodyguards) एक म्हणून तान्या मित्तलची ओळख निर्माण झाली आहे. शोदरम्यान तिने आपल्या आलिशान जीवनशैलीसह प्रचंड संपत्ती, कारखान्यांचे विस्तृत जाळे आणि व्यावसायिक साम्राज्याबाबत केलेल्या दाव्यांमुळे मोठी चर्चा आणि वाद निर्माण झाले होते. बिग बॉसच्या घरात अनेक वेळा तिच्या वक्तव्यांवर सह-स्पर्धकांनी शंका व्यक्त केली होती. काही स्पर्धकांनी तिचे दावे अतिशयोक्त असल्याचे म्हटले, तर काहींनी त्यावर खुलेपणाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरही तान्या मित्तलच्या खरेपणाबाबत जोरदार चर्चा सुरू झाली होती.शोदरम्यान सर्वाधिक गाजलेला मुद्दा म्हणजे तान्याने केलेला 150 बॉडीगार्ड असल्याचा कथित दावा. हा मुद्दा इतका व्हायरल झाला की तो बिग बॉसच्या घराबाहेरही चर्चेचा विषय ठरला. अनेकांनी या दाव्याला खोटे ठरवत टीका केली, तर काहींनी तिच्या संपत्तीबाबत शंका व्यक्त केली. या सगळ्या वादांनंतर तान्या मित्तलने स्वतः पुढे येत आपल्या व्यवसायाची आणि वास्तवाची झलक लोकांसमोर मांडण्याचा निर्णय घेतला.

अलीकडेच तान्या मित्तलने न्यूज पिंच या माध्यमाला आपल्या घराचा तसेच (bodyguards)फार्मास्युटिकल फॅक्टरीचा दौरा करून दिला. यावेळी तिने आपल्या व्यवसायाच्या विविध पैलूंवर सविस्तर माहिती दिली. फॅक्टरीत तिने औषधनिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक यंत्रसामग्री, लॅब, टेस्टिंग एरिया आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या युनिट्स दाखवले. या सर्व मशिन्स मलेशियातून मागवण्यात आल्याचा दावा तिने केला. तसेच या युनिटमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून औषधनिर्मिती केली जाते, असेही तिने सांगितले.
या दौर्यादरम्यान तान्याने 150 बॉडीगार्डच्या दाव्यावरही स्पष्ट भूमिका मांडली. (bodyguards)’मी कधीही असे म्हटले नाही की माझ्याकडे 150 बॉडीगार्ड आहेत. इंटरनेटवर अशी एकही क्लिप सापडणार नाही ज्यात मी स्वतः असा दावा करताना दिसते,’ असे तिने ठामपणे सांगितले. हा संपूर्ण गैरसमज घरातील एका मस्करीमुळे निर्माण झाल्याचे तिने स्पष्ट केले. “घरात जीशान याबाबत मस्करी करत होता. प्रत्यक्षात मी एवढेच सांगितले होते की माझ्याकडे 150 पेक्षा जास्त स्टाफ मेंबर्स आहेत. मात्र त्या विधानाचा अर्थ बदलून स्टाफला बॉडीगार्ड म्हणून दाखवण्यात आले आणि त्यातून हा वाद वाढत गेला,’ असे तान्याने सांगितले.

150 बॉडीगार्डचा दावा पूर्णपणे फेटाळून लावत (bodyguards)असतानाच तान्याने एवढे मात्र मान्य केले की तिच्याकडे सुरक्षेसाठी बॉडीगार्ड असतात. ‘मी अनेक वर्षांपासून सुरक्षेसाठी बॉडीगार्ड ठेवते, मात्र त्यांची नेमकी संख्या सांगणे मला योग्य वाटत नाही,’ असे तिने नमूद केले. तिच्या म्हणण्यानुसार, व्यवसायाच्या स्वरूपामुळे आणि प्रवासाच्या वेळी सुरक्षेची आवश्यकता भासते.दरम्यान, बिग बॉस 19 संपल्यानंतरही तान्या मित्तल सतत चर्चेत आहे. तिच्या वक्तव्यांमुळे, व्यवसायाच्या दाव्यांमुळे आणि आता दिलेल्या स्पष्टीकरणामुळे पुन्हा एकदा ती चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. 150 बॉडीगार्डचा दावा खरा की खोटा, या प्रश्नावर तिने दिलेल्या उत्तरानंतरही सोशल मीडियावर प्रतिक्रिया येत असून, प्रेक्षक आणि चाहत्यांमध्ये यावर संमिश्र मत व्यक्त केली जात आहेत.
हेही वाचा :
नोकरीला कंटाळलात? 2026 मध्ये पैसे कमावण्याच्या या आहेत 5 बेस्ट आयडिया
२०२६ मध्ये मोठे आर्थिक संकट? बाबा वेंगाच्या भविष्यवाण्यांनी जगभरात माजली
Sangli Crime: कॉलेजसमोरुन निघाला, चौघांनी अडवलं अन्… सांगलीत 22