दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा काही दिवसात सुरु होणार आहे.(students) दहावी-बारावीचे विद्यार्थी आता अभ्यासाला लागले आहेत. दरम्यान, आता बारावीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट दिले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी सोमवारपासून हॉल तिकीट दिले जाणार आहे.

बारावीची परीक्षा फेब्रुवारीत सुरु होणार आहे.(students) त्यासाठी एक महिनाभर आधी म्हणजे १२ जानेवारीपासून हॉल तिकीट दिले जाणार आहे. सर्व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर सोमवारपासून उपलब्ध होणार आहेत, याबाबत राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी माहिती दिली आहे.
बारावीच्या परीक्षेसाठी बसणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध करुन दिले जाणार आहे. (students)यानंतर मंडळाच्या उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी या हॉल तिकीटची प्रत काढून विद्यार्थ्यांना द्यायची आहे. यासाठी कोणतेही वेगळे शुल्क लागणार नाहीये. प्रवेशपत्राच्या प्रतीवर मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांची सही असणे आवश्यक आहे, अशा सूचना राज्य मंडळाने दिल्या आहेत.

हॉल तिकीटवर फोटो असल्यावर त्यावर मुख्याध्यापक,(students) प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे. यानंतरच हॉल तिकीट ग्राह्य धरले जाईल. बारावीची परीक्षा ही १० फेब्रुवारी ते १८ मार्च रोजी होणार आहे. या कालावधीत परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांकडे हॉल तिकीट असणे अनिवार्य आहे.
हेही वाचा :
आचारसंहिता सुरू असतानाच कोल्हापुरातील ६२ सीसीटीव्ही बंद
इचलकरंजी निवडणूक रणांगणात मोठी हालचाल; २२ उमेदवारी अर्ज माघारी,
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! १० वर्षे पूर्ण करणाऱ्यांसाठी महत्वाचा