माणुसकीला काळीमा फासणारी घटना पुदुच्चेरीमध्ये घडली आहे.(locked) येथील एका 14 वर्षीय शाळकरी मुलीवर तिच्या प्रियकरासहीत चार जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सर्व आरोपीही अल्पवयीन असून पोलिसांनी वेळीच दखल घेतल्याने पीडितेला वाचवण्यात यश आलं. चारही संशयितांना अटक करण्यात आली असून सर्व आरोपी 17 वर्षांचे आहेत. पुदुच्चेरीमधील या 14 वर्षीय पीडित मुलीला तिच्या प्रियकरासह चार अल्पवयीन मुलांनी कोंडून ठेवलं. त्यानंतर त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. सर्व संशयितांना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे. प्राथमिक तपासामध्ये घटनाक्रम समोर आला असून अल्पवयीन मुलांनी हे सारं केलं आहे यावर पोलिसांचा विश्वासच बसत नाहीये. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई केली, पीडितेला वाचवले. पोलिसांनी पीडितेला तत्काळ वैद्यकीय मदत मिळवून दिली. या मुलीला समुपदेशन आणि इतर सहाय्यही पुरवण्यात आले आहे.

आरोपींनी नेमका गुन्हा कसा घडला याचा घटनाक्रम निश्चित करण्याचा (locked) प्रयत्न 17 वर्षे वयोगटातील चारही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. सर्व आरोपी अल्पवयीन असल्याने, या प्रकरणाची चौकशी बाल न्याय कायद्यांतर्गत केली जात आहे. लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण करणाऱ्या पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा कसा घडला यासंदर्भातील संपूर्ण परिस्थितीजन्य पुराव्यांबरोबरच नेमका घटनाक्रम.जाणून घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. या आरोपामधील प्रत्येक आरोपीची भूमिका निश्चित करण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.मुलीच्या प्रियकराने तिला फसवून एका बंद खोलीत नेले. त्यानंतर इतर तीन मुलंही या खोलीत शिरली आणि चौघांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. अधिकाऱ्यांच्या त्वरित हस्तक्षेपामुळे मुलीचे प्राण वाचले. मुलीची तात्काळ सुरक्षा सुनिश्चित झाली.

या प्रकरणामुळे पुदुच्चेरीमध्ये संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळत आहे. (locked) मुलांची सुरक्षा व अल्पवयीन मुलांचा समावेश असलेल्या लैंगिक गुन्ह्यांबद्दल वाढती चिंता या प्रकरणामुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे. बाल हक्क कार्यकर्त्यांनी या कृत्याचा निषेध केला आहे. मुलांना लैंगिक हिंसेपासून वाचवण्यासाठी जनजागृती मोहीम, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि समाज म्हणून आपण सर्वांनीच अधिक मजबूत यंत्रणा उभी करुन अधिक दक्षता बाळगण्याची आवश्यक असल्याचं बाल हक्क कार्यकर्ते सांगतात.या मुलीचं समुपदेशन करण्यात आलं असून तिला आवश्यक ती मदत केली जात असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. असे गुन्हे रोखण्यासाठी बाल संरक्षण कायद्यांची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
हेही वाचा :
गोड, जंक फूडमुळे लहान मुलांमध्ये वाढतोय मधुमेहाचा धोका
मोठी बातमी! मतदानावर बहिष्कार, महापालिका निवडणूक संकटात
तरुणीला बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं, कुटुंबीयांकडून अन्