उत्तर प्रदेशमधील मेरठ शहरात पोलिसांनी एका अनधिकृत स्पा सेंटरवर धडक कारवाई केली.(activities) पोलिसांच्या कारवाईत धक्कादायक घटना उघडकीस आली. मसाजच्या नावाखाली स्पा सेंटरमध्ये देह विक्रीचा व्यावसाय सुरू होता, असा अंदाज पोलिसांना होता. पण धाड टाकल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. स्पा सेंटरमधून पोलिसांनी एका तरूणाला आणि २० मुलींना ताब्यात घेतलेय.मेरठ पोलिसांनी सांगितले की, मागील काही काळापासून शहरातील विविध भागात स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्री सुरू असल्याच्या तक्रारी येत होत्या. या सेंटरच्या नावाखाली अनैतिक कृत्ये केली जात असल्याचा संशयही व्यक्त केला जात होता. नागरिकांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत स्पा सेंटरवर धाड टाकली. पोलिसांनी येथून २० मुलींना ताब्यात घेतलेय.

स्पा सेंटर्ससाठी व्हॉट्सअॅप आणि इतर ऑनलाइन माध्यमांद्वारे बुकिंग करण्यात (activities) आल्याचे तपासात समोर आले. ग्राहक थेट स्पासेंटरला भेट देत नव्हते, तर प्रथम त्यांच्याशी संपर्क साधला जात होता. त्यानंतर त्यांना त्यांचे स्थान विचारले जात असे किंवा स्थान पाठवले जात होते. त्यामुळेच हे नेटवर्क पोलिसांना इतके दिवस सापडले नाही. ग्राहकांना व्हॉट्सअॅप अथवा टेलिग्रामवर मुलींच्या डिटेल्स पाठवल्या जात होत्या. त्यानंतर दर ठरवून पुढील जागा ठरवली जात होती. या पद्धतीने केवळ गोपनीयता राखली जात नव्हती तर कायद्यापासून वाचण्याचा मार्गही निर्माण झाला होता, असे तपासात समोर आले.

मेरठ पोलिसांनी शहरात एकाचवेळी ४ ठिकाणी धाड टाकली. त्यासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती. अचानक झालेल्या या कारवाईमुळे उपस्थित लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून २० तरुणी आणि एका तरुणाला ताब्यात घेतले. त्या प्रत्येकाची स्वतंत्रपणे चौकशी केली जात आहे. छापेमारीदरम्यान, पोलिसांनी स्पा सेंटरमधून रजिस्टर देखील जप्त केले आहे. त्याशिवाय मोबाइल फोनही जप्त करण्यात आलेत. त्यामध्ये ऑनलाइन बुकिंगचे पुरावे सापडल्याचा दावा पोलिसांनी केलाय. स्पा सेंटरवर बेकायदेशीरपणे चालवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू आहे. हे स्पा सेंटर कोण चालवत होते, त्यामागे कोण होते आणि ते मोठ्या नेटवर्कचा भाग होते का हे देखील पोलिस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

स्पा सेंटरवर छापा टाकला त्यावेळी २० तरूणींमध्ये फक्त एकच मुलगा(activities) आढळला अन् पोलिसाही चक्रावले. पोलिसांनी या घटनेला फक्त योगायोग मानले नाही, त्यांनी खोल तपास सुरूवात केला. मुलींना वेगवेगळ्या ठिकाणांहून शहरात आणले जाते अन् त्यांचा वापर स्पा सेंटरमध्ये सर्व्हिस देण्यासाठी केला जात असल्याचं पोलिसांनी सांगितलेय. तरूणी दबावात अथवा प्रलोभनाखाली येथे काम करण्यास भाग पाडले जात होते की त्या स्वच्छेने यात सहभागी झाल्या, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येतोय. तपास पूर्ण झाल्यानंतर कायदेशीर कारवाईची दिशा ठरवली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा :

पगाराचा मार्ग मोकळा! अखेर अधिकारी करणार

यूपीआयचा वेगाने जागतिक विस्तार! लवकरच ‘या’

मतदानाचा फोटो शेअर केला तर कायदेशीर

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *