भारताचा स्टार गोलंदाज युजवेंद्र चहल आणि त्याची पूर्व पत्नी कोरिओग्राफर (divorce) धनश्री वर्मा हे दोघे सध्या चर्चेत आले आहेत. मागच्या काही दिवसांपासून घटस्फोटानंतर दोघे ‘द 50’ या रिऍलिटी शोमध्ये एकत्र दिसणार अशी चर्चा होती. युजवेंद्र चहलने धनश्री वर्मासोबत 2020 मध्ये लग्न केलं होतं, मात्र चार वर्षांनी दोघांनी घटस्फोट घेतला. 2025 मध्ये ते दोघे वेगळे झाले. घटस्फोटाच्या 11 महिन्यांनी दोघे रिऍलिटी शोमध्ये एकत्र येणार अशी चर्चा असताना युजवेंद्र चहलने सोशल मीडियावर एक पोस्ट करून माहिती दिली आहे.

‘द 50’ हा शो फेब्रुवारी महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.(divorce) यात स्पर्धक म्हणून कोणते कलाकार सहभागी होणार यासाठी फॅन्स उत्सुक असून यासंदर्भात अनेक कलाकारांची नाव चर्चेत आहेत. यात भारताचा क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि त्याची पूर्व पत्नी धनश्री वर्मा या दोघांचं नाव चर्चेत होतं. क्रिकेटर युजवेंद्र चहलने इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करून लिहिले की मागच्या काही दिवसांपासून मी एका रिऍलिटी शोमध्ये भाग घेणार आहे अशी चर्चा आहे. मात्र ही गोष्ट एक अफवा आणि चुकीची असून तसं काहीही नाही. त्यांनी स्पष्ट केले की त्यांचा या शोशी कोणताही संबंध नाही आणि अशा कोणत्याही चर्चा झालेल्या नाहीत. त्यांनी मीडिया आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांना खोट्या बातम्या पसरवण्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

युजवेंद्र चहलच्या टीमने सांगितलं की, ‘युजवेंद्र चहल एका रिऍलिटी शोमध्ये सहभागी होत असल्याच्या व्हायरल बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. हे दावे केवळ अनुमानांवर आधारित आहेत आणि पूर्णपणे खोटे आहेत. अलिकडच्या अहवालांमध्ये दावा केल्याप्रमाणे, युजवेंद्र कोणत्याही कार्यक्रमात जाणार नाही आणि त्याने याबद्दल कोणाशीही चर्चा केलेली नाही. आम्ही मीडिया प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांना अशी माहिती टाळण्याची आणि ती पसरवू नये अशी विनंती करतो’.

धनश्री वर्मा ही घटस्फोटानंतर एका रिअ‍ॅलिटी शो मध्ये गेली होती. (divorce)यात तिने एका स्पर्धकाशी बोलताना सांगितलं होतं की, लग्नाच्या काही महिन्यांनी तिने युजवेंद्रला तिच्या सोबत चिट करताना पकडलं होतं. तर काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असं देखील सांगण्यात आलं की धनश्रीला मुंबईला राहायची इच्छा होती, आणि तिला असं वाटत होतं की चहलने त्याच्या हरियाणातील कुटुंबाला सोडून तिच्या सोबत मुंबईत शिफ्ट व्हावं. या दोघांवरून दोघांचं भांडण झालं आणि मग ते प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचलं.धनश्री वर्मा सोबत विभक्त झाल्यावर क्रिकेटर युजवेंद्र चहल हा आरजे महवश हिला डेट करतोय अशी चर्चा आहे. अनेकदा दोघांना एकत्र पाहण्यात आलंय. आरजे महवश ही स्टेडियममध्ये चहलला सामन्यादरम्यान चिअर करताना दिसली. दोघांना बऱ्याचदा एकत्र स्पॉट करण्यात आलं, त्यामुळे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जातंय.

हेही वाचा :

गोड, जंक फूडमुळे लहान मुलांमध्ये वाढतोय मधुमेहाचा धोका

मोठी बातमी! मतदानावर बहिष्कार, महापालिका निवडणूक संकटात

तरुणीला बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं, कुटुंबीयांकडून अन्

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *