युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा गेल्या वर्षी घटस्फोटामुळे चर्चेत होते.(together) त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये एकमेकांबद्दल वक्तव्ये केली यामुळे अनेक वाद निर्माण झाले. चाहत्यांनी अनेक आरोप लावले सोशल मीडियावर यांच्या घटस्फोटाबद्दल खूप चर्चा रंगल्या होत्या. आता घटस्फोटानंतर ते पुन्हा एकत्र येणार असल्याच्या बातम्या येत आहेत. पण, यात एक ट्विस्ट आहे.

वृत्तानुसार, हे दोघे कलर्स टीव्हीच्या ‘द ५०’ शोमध्ये एकत्र दिसतील.(together) निर्मात्यांनी अद्याप स्पर्धकांची निश्चित यादी जाहीर केलेली नसली तरी, हे कपल एकत्र दिसतील असे वृत्त आहे. हा शो १ फेब्रुवारी रोजी प्रीमियर होईल आणि कलर्स टीव्ही व्यतिरिक्त जिओ हॉटस्टारवर प्रसारित होईल. या शोमध्ये टीव्ही, मनोरंजन, क्रीडा आणि सोशल मीडिया क्षेत्रातील स्टारसह ५० स्पर्धक असतील.

याशिवाय, ज्या सेलिब्रिटींची नावे चर्चेत आहेत त्यात शिव ठाकरे,(together)अंकिता लोखंडे, निक्की तांबोळी, प्रतीक सहजपाल, उर्फी जावेद, अंशुला कपूर, तान्या मित्तल आणि फैसल शेख यांचा समावेश आहे. यासह श्रीसंत, इम्रान खान आणि औरी देखील या शोमध्ये दिसू शकतात.युजवेंद्र आणि धनश्रीबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी २०२० मध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती, परंतु त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही आणि २०२५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर, चहलचे नाव आरजे महवशशी देखील जोडले गेले आहे. पण, त्यांनी एकमेकांचे मित्र असल्याचे सांगितले. घटस्फोटानंतर ते एकत्र या शोमध्ये येणार का? हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

हेही वाचा :

आचारसंहिता सुरू असतानाच कोल्हापुरातील ६२ सीसीटीव्ही बंद

इचलकरंजी निवडणूक रणांगणात मोठी हालचाल; २२ उमेदवारी अर्ज माघारी,

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! १० वर्षे पूर्ण करणाऱ्यांसाठी महत्वाचा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *