लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. (received)आता लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळणार नाहीये. महापालिका निवडणुकीआधी महिलांना ३००० रुपये येणार नाहीयेत. राज्यातील महापालिका निवडणुकीआधी डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र येणार असल्याचे सांगितले होते. मात्र, आता महिलांना फक्त एकच हप्ता दिला जाणार आहे. महिलांच्या खात्यात फक्त १५०० रुपये जमा केले जाणार आहेत. त्यामुळे महिलांना निराशा झाली आहे.

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर डिसेंबर-जानेवारीचा हप्ता एकत्र दिला जाऊ नये, (received)यासाठी काँग्रेसने निवडणुक आयोगाकडे धाव घेतली होती. आचारसंहितेच्या काळात अग्निम स्वरुपाचा लाभ कसा देता येईल, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर आयोगाकडून स्पष्ट भूमिका घेतली आहे. वेळेआधी तुम्ही योजनेचा हप्ता देऊ शकत नाही, असं निवडणुक आयोगाने म्हटलं आहे. यामुळे आता लाडक्या बहिणींना फक्त डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे.
आदिती तटकरेंना लाडकी बहीण योजनेबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. (received)त्यावर त्या म्हणाल्या की, विरोधकांना सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजना ही खटकत आली आहे. महायुतीने सुरुवात केलेल्या या योजनेला घोषित झालेल्या दिवसापासून या योजनेला विरोध झालेला आहे. महिलांसाठी पहिल्यांदाच ही योजना आली आहे. पंधराशे रुपयांचा आम्ही लाभ घेत असतो,जवळपास वर्ष उलटून गेली आहे ही योजना आम्ही राबवत आहोत.
आता ही रेगुलर स्कीम आहे. आयोगाने या संदर्भात आमच्या विभागाला विचारणा केली होती. (received)या संदर्भातला योग्य तो खुलासा आणि स्पष्टीकरण शासनाच्या माध्यमातून निवडणूक विभागाला दिलं आहे. आम्ही कुठेही आचारसंहितेचा भंग करून किंवा निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमाचा उल्लंघन करून आम्ही कुठलीही योजना राबवीत नाही. एखादी स्कीम जर महिलांना आनंद देणारी असेल तर त्याचा लाभ जर गरजू महिलांपर्यंत पोहोचत असेल तर एखाद्या गोष्टीवर दहा वेळा आक्षेप घेऊन आपण लाडक्या बहिणींना नाराज करत आहोत असं मला वाटतं.
हेही वाचा :
२० जिल्हा परिषदांच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात
युजवेंद्र चहल – धनश्री वर्मा घटस्फोटानंतर एकत्र येणार? क्रिकेटरने पोस्ट करून स्वतः
ट्रॅफिक चालान न भरल्यास आरसी रद्द, लायसन्स होणार सस्पेंड; सरकार नवीन