इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीत यंदा भाजप आणि शिवशाहू विकास (power) आघाडी यांच्यात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. शहरातील बहुतांश प्रभागांमध्ये दोन्ही प्रमुख आघाड्यांमध्ये कांटे की टक्कर सुरू असल्याचे चित्र मतमोजणीदरम्यान स्पष्ट झाले. काही प्रभागांमध्ये भाजपच्या उमेदवारांनी आघाडी घेतली, तर अनेक प्रभागांमध्ये शिवशाहू विकास आघाडीचे उमेदवार पुढे असल्याचे दिसून आले. त्यामुळे इचलकरंजीच्या राजकीय समीकरणांकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते.

इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये ६५ प्रभाग आहेत. इचलकरंजी (power) महापालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ मध्ये चुरशीने मतदान झाले. या प्रभागात सर्वाधिक ७७.३४ टक्के मतदान झाले आहे. तर, सर्वाधिक कमी मतदान प्रभाग क्रमांक १० मध्ये ६४.२२ टक्के इतके झाले. एकूण २ लाख ४८ हजार ९०७ मतदारांपैकी १ लाख ७३ हजार ६४१ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ८८ हजार ३३९ पुरुष मतदारांनी तर ८५ हजार २९५ महिलांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे, ५५ पैकी केवळ ७ तृतीयपंथीय मतदारांनी मतदान केले.

या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ क मध्ये विशेष लक्षवेधी आणि अटीतटीची (power) लढत पाहायला मिळाली. या प्रभागात शिवशाहू विकास आघाडीचे उमेदवार संजय तेलनाडे यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार पारीसनाथ घाट यांचा पराभव करत महत्त्वाचा विजय नोंदवला. पारीसनाथ घाट हे आमदार राहुल आवाडे यांचे कट्टर समर्थक आणि सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते, त्यामुळे या पराभवाची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे.इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीत ६५ जागांपैकी भाजपा महायुतीने ४३ जागा तर, महाविकास आघाडी पुरस्कृत शिव शाहू विकास आघाडी १७, शिवसेना एकनाथ शिंदे गट ३, शिवसेना उबाठा गट १ व राष्ट्रवादी अजित पवार गट १ जागांवर विजय मिळवला आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी! जगात काहीतरी भयंकर घडणार; इराणचा भारताला फोन,

कुठे ईव्हीएम फोडले, तर कुठे उमेदवारांवर हल्ला; राज्यातील मतदानाला गालबोट

मासिक पाळीत पोटात दुखू लागलं, वेदनांनी १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *