इचलकरंजी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी सुरू (witnessed) असून आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भारतीय जनता पक्षाचे चार, तर शिव-शाहू विकास आघाडीचे चार उमेदवार विजयी झाले आहेत.प्रभाग क्रमांक ४ मध्ये भाजपचे मनोज हिंगमिरे, मोनाली मांजरे, मनिषा कुपटे, आणि दिलीप झोळ यांनी विजय मिळवला आहे. या प्रभागात भाजपच्या उमेदवारांनी आघाडी घेत निर्णायक यश संपादन केले.

तर, प्रभाग क्रमांक ७ मध्ये शिव-शाहू विकास आघाडीचे अमृता चौगुले,(witnessed) नंदकुमार पाटील, मदन कारंडे आणि क्रांती आवळे हे चारही उमेदवार विजयी झाले असून, त्यांच्या विजयानंतर समर्थकांनी जल्लोष केला.इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीत यावेळी भाजप आणि शिव-शाहू विकास आघाडी यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळाली.
गुरुवारी झालेल्या मतदानात शहरात सुमारे ६८ टक्के मतदानाची(witnessed) नोंद झाली होती.महानगरपालिकेच्या एकूण ६५ जागांसाठी शहरातील ३०२ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र, अनेक ठिकाणी मतदान केंद्र शोधताना मतदारांची मोठी गैरसोय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
हेही वाचा :
मोठी बातमी! जगात काहीतरी भयंकर घडणार; इराणचा भारताला फोन,
कुठे ईव्हीएम फोडले, तर कुठे उमेदवारांवर हल्ला; राज्यातील मतदानाला गालबोट
मासिक पाळीत पोटात दुखू लागलं, वेदनांनी १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू