बॉलीवूड अभिनेता गोविंदा सध्या त्याच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा (shocking)त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा अनेक मुलाखतींमध्ये तिच्या पतीच्या कथित एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सबद्दल बोलत आहे. एका नवीन मुलाखतीत सुनीता यांनी पुन्हा एकदा तिच्या पतीच्या अफेअर्सवर टीका केली आहे. तिने म्हटले आहे की नवीन अभिनेत्री अनेकदा स्टार्सना फसवतात. परंतु तिने यासाठी गोविंदालाही जबाबदार धरले आहे.

सुनीता आहुजाने अलीकडेच मिस मालिनी यांना मुलाखत दिली. (shocking) गोविंदाच्या अफेअर्सवरील तिच्या मागील कमेंट्सबद्दल विचारले असता सुनीता म्हणाली, “माझी मुले मोठी झाली आहेत. मी नेहमीच त्याला सांगते की या गोष्टीमुळे ते नेहमी डिस्टर्ब होतात. मी नेहमीच त्याला म्हणते की हे तुझं वय नाही. पण त्याला हे खूप चांगलं माहिती आहे की, स्ट्रगल करणाऱ्या आजच्या मुलींना त्यांचा खर्च भागवण्यासाठी शुगर डॅडीची आवश्यकता असते. त्यांना ना रुप ना चेहरा पण हिरोईन व्हायचं आहे. मग काय काही लोक त्यांना फसवतात. ब्लॅकमेल करतात आणि आपलं काम काढण्यासाठी शुगर डॅडी होतात.
सुनीता पुढे म्हणाली, “अशा मुली खूप आहेत, पण तू इतकी मूर्ख नाहीस. (shocking) तू ६३ वर्षांचा आहेस. तुझे चांगलं कुटुंब आहे, एक सुंदर पत्नी आहे आणि दोन मोठी मुले आहेत. ६३ वर्षांच्या वयात तू हे सर्व करू शकत नाहीस. तू हे तुझ्या तरुणपणात करणं ठिक होतं. आपण आपल्या तरुणपणात चुका करतो, पण या वयात नाही.”सुनीता आणि गोविंदाचे लग्न होऊन ३८ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांना यशवर्धन आणि टीना ही दोन मुले आहेत. गोविंदाचा मुलगा यशवर्धन लवकरच साजिद खानच्या हॉरर कॉमेडी ‘हंड्रेड’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तो ‘लापता लेडीज’ फेम अभिनेत्री नितांशी गोयलसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
हेही वाचा :
राज्यावर पुन्हा दुहेरी संकट! ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा
खूशखबर! लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? महत्वाची माहिती समोर
युजवेंद्र चहलच्या आयुष्यात ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री! कोण आहे ती?