लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. (personally) लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले होते. अनेक महिलांनी केवायसी करुनदेखील त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. यामुळे महिलांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, आता लाडक्या बहिणींची पडताळणी करण्याच्या केवायसीबाबत पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आले आहे.लाडकी बहीण योजनेत अनेक महिला निकषात असूनदेखील केवायसीतील काही अडचणींमुळे त्यांचा लाभ बंद झाला आहे. यामुळेच योजनेच्या निकषानुसार लाभार्थ्यांना अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी याबाबत माहिती दिली आहे.

लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करण्याची शेवटची (personally) तारीख ३१ डिसेंबर २०२५ होती. तोपर्यंत महिलांनी केवायसी केली आहे. तरीही अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे महिलांनी मुख्यमंत्र्यांनादेखील पत्र लिहलं होतं. याच पार्श्वभूमीवर आता सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.लाडकी बहीण योजनेत केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडल्यामुळे महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. आता या लाभार्थ्यांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांद्वारे प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे.
यामुळे आता अंगणवाडी सेविका महिलांच्या घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहे. (personally )त्यानंतर पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत.लाडकी बहीण योजनेसाठी काही निकष ठरवून देण्यात आले आहेत. या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. यामध्ये २१ ते ६० वयोगटातील महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे, चारचाकी वाहन नसावे. या सर्व निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे.
हेही वाचा :
पंचायत समिती निवडणूक रणधुमाळी; उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू
भाजपचे नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात; वडेट्टीवारांचा दावा, सुधीर मुनगंटीवार म्हणाले…
सर्वात मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद